Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात (Extortion Case) ईडीच्या (ED) रडारवर आहेत. ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आतापर्यंत तीन वेळा चौकशीसाठी (Summons) बोलावले होते. मात्र, तिन्हीवेळस त्यांनी आजारपणाचे कारण सांगत चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने त्यांची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यामुळे अनिल देशमुख भूमिगत (underground) झाले असून ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले. परंतु आता देशमुख यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh underground gossip ed searching video goes viral

गैरसमज पसरवला जात आहे

अनिल देशमुख गायब झाल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अनिल देशमुख यांनी स्पष्टिकरण दिले आहे. ईडीने माझ्या कुटुंबाची 4 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त (Property Seized) केली आहे. ही जमीन माझा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh) याने 2.67 कोटी रुपयांना 2006 मध्ये घेतली होती. ही जमिन 300 कोटींची असल्याचा काही माध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या आहेत. यातून गैरसमज पसरवला जात आहे. मी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल, त्यानंतर मी स्वत: ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

 

 

देशमुखांचा फोन नॉट रिचेबल

दरम्यान, रविवारी अनिल देशमुख यांचा ईडीने नागपूर जवळच्या अनेक भागात शोध घेतला. यासाठी ईडीची पथके नागपूरमध्ये दाखल झाली होती. अनिल देशमुख हे ज्या ठिकाणी जाऊ शकतात, अशा ठिकाणी पथकाने तपास केला. या शोधमोहिमेत देशमुख यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी देखील शोध घेण्यात आला. याशिवाय काही संशयास्पद ठिकाणी देखील पथकाने शोध घेतला. त्यानंतर ते गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने त्यांना शोधणे कठीण जात असल्याची माहिती देण्यात आली.

हे देखील वाचा

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Arogya Rakshak | LIC ने लाँच केला आरोग्य रक्षक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, मिळतात ‘हे’ सर्व फायदे; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Deshmukh | former maharashtra home minister anil deshmukh underground gossip ed searching video goes viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update