Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात 31% घसरला; खरेदीची आहे का संधी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rakesh Jhunjhunwala | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्श्युरन्स कंपनीचा शेअर सातत्याने दबावात आहे. गुरुवारी तो इंट्राडेमध्ये बीएसईवर जवळपास 2 टक्के घसरून 488.55 रुपयांच्या खालच्या स्तरावर पोहचला. दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये लागोपाठ 12 व्या दिवशी घसरण दिसून आली. 14 जून 2022 च्या 703.35 रूपयांच्या स्तरापासून शेअर आतापर्यंत 31 टक्के घसरला आहे. (Rakesh Jhunjhunwala)

 

ऑल टाइम हायपासून 48 टक्के घसरला शेअर

स्टार हेल्थने 10 डिसेंबर 2021 ला स्टॉक मार्केटमध्ये पाऊल ठेवले होते आणि तेव्हापासून 900 रूपयांच्या इश्यू प्राईसपासून शेअर 46 टक्के घसरला आहे. तर 940 रूपयांच्या ऑल टाइम हायपासून शेअर 48 टक्के घसरला आहे. शेअरने लिस्टिंगच्या दिवशीच ऑल टाइम हाय गाठला होता.

राकेश झुनझुनवाला स्टार हेल्थचे प्रमोटर आहेत. डाटावरून समजते की, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची मार्च 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीत 17.51 टक्के भागीदारी होती. (Rakesh Jhunjhunwala)

 

या कारणांमुळे होऊ शकते वाढ

प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी हेल्थ इन्श्युरन्स कंपनी स्टार हेल्थच्या 7,250 कोटी रूपयांच्या आयपीओला महागड्या व्हॅल्यूएशनमुळे चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता आणि कोविड-19 मुळे त्याची प्रॉफिटेबिलिटी कमी झाली होती.

मात्र, व्यवस्थापनाला पुढील दोन-तीन वर्षात रिटेल हेल्थ सेगमेंटची सीजीआर ग्रोथ 20-25 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
असे मानले जाते की, कंपनीला छोट्या शहरांवर जोर, नवीन बँक पार्टनर्ससोबत करारामुळे ग्रोथ मिळू शकते.

 

काय म्हणत आहेत ब्रोकरेज

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस स्टार हेल्थच्या शक्यतेबाबत आशावदी आहे.
त्यांच्यानुसार, कंपनीला रिटेल हेल्थमध्ये ग्रोथ, चांगली अर्निंग ग्रोथमुळे मर्यादित चक्रिय जोखमीचा लाभ मिळू शकतो.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सनराईज सेक्टरमध्ये हेल्थ स्टार आकर्षक शेअर आहे.
आमचे मत आहे की, 1-2 तिमाहिंमध्ये चांगल्या ग्रोथसह स्टार हेल्थच्या शेअरमध्ये मजबूती पहायला मिळेल.
शेअरमधील अलिकडील घसरण नवीन खरेदीसाठी चांगली संधी असू शकते.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned star health stock slipped 31 percent in 12 trading days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा