राखी सावंतने पतीकडे मागितला घटस्फोट, तिला व्हायचंय अभिनवची दुसरी पत्नी

मुंबई : बिग बॉस 14 मध्ये राखी सावंतच्या (Rakhi sawant) विवाहाबाबत आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. शोमध्ये स्वत: राखी आपला विवाह आणि पती रितेश संबंधी गोष्टी घरच्यांशी शेयर करताना दिसून आली आहे. मात्र, राखी हे सर्व मस्करीत बोलतानाच दिसून आली आहे, ज्यामुळे घरातील सदस्यांसह दर्शकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. आता राखी सावंत (Rakhi sawant) आपला पती रितेशकडे घटस्फोट मागताना दिसत आहे.

राखी, सोनाली फोगाट, अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक गार्डन एरियामध्ये बसून बोलत असतात. यावेळी राखी आपल्या पतीबाबत चर्चा करते. ती म्हणते – जा तुला घटस्फोट द्यायचा आहे तर दे. मी नाही घाबरत तुला. दिड वर्षापासून तो आलाच नाही.

राखी सावंतचे बोलणे अभिनव, सोनाली आणि रुबीना तिघांना हैराण करते. राखीच्या या बोलण्याने अभिनवला आश्चर्य वाटते आणि तिचा पती न येण्याचे कारण तो विचारतो. राखी कारण तर सांगत नाही पण आपल्या मॅरिड लाइफची कथा सांगू लागते.

ती म्हणते – मी त्याला तीन वेळा बोलावले, तो आलाच नाही लग्न करण्यासाठी. चार वेळा मेहंदी लावली, आलाच नाही. माझ्या हृदयात हसबंडसाठी घंटी वाजलीच नाही. फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा येईल तेव्हा वाजवेन. मी कुठे मुलगा शोधायला जाऊ. एकटी आहे, तर कंपेनियनशिप हवीय. मला हे सर्व मीडियात आणायचे नव्हते. हे बोलून ती रडू लागते.

आता राखीचा पती रितेश आणि तिचे विवाहाबाबत सांगणे केवळ मौजमस्ती होती की खरोखच ती वैवाहिक जीवनाबाबत दुखी आहे, हे तर काळच सांगेल. याबाबत राखी बीग बॉसशी सुद्धा बोलत असते.

बिग बॉस समोर राखी रडत सांगते – माझी इच्छा आहे की माझा पती एकदा सर्वांसमोर यावा. इथपर्यंत तर ठिक होते पण यानंतर ती पुन्हा आपल्या एंटरटेनमेंट मोडमध्ये जाते.

ती म्हणते – सर्वांच्या पतींना पाहते तेव्हा हृदयात काहीतरी होऊ लागते. मी रुबीनाचा पती का नको चोरू. राखीने अभिनव शुक्लाबाबत आपल्या अट्रॅक्शनचा उल्लेख यापूर्वी देखील केला आहे.

तिने शोमध्ये येताच म्हटले होते की, अभिनव आणि रुबीना तिचे आवडते कपल आहे. मी त्यांच्याशी कधीच भांडू शकत नाही. पण, बिग बॉसशी बोलताना राखी रुबीनाची सवत बनण्याची इच्छा सुद्धा जाहीर करते.

राखी अभिनवबाबत म्हणते – त्याची बॉडी शानदार आहे. मला त्याला पूर्णपणे पटवायचे आहे. पुढे कोणताही डान्स असेल तर मला द्या. त्याची बायको (रुबीना) तर त्याच्यासाठी भांडते, दुसरी बायको (राखी सावंत) सुद्धा भांडेल. आपल्या या बोलण्यात सुधारणा करत राखी पुन्हा म्हणते – म्हणजे बायको झाले नाही, पण गर्लफ्रेंड तर आहे ना.