Rakhi Sawant | अखेर राखी सावंतने सांगितले तिचे दुसरे लग्न लपवण्यामागचे कारण; म्हणाली ” त्याची बदनामी होईल…..”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rakhi Sawant | कॉन्ट्रोव्हर्सी अभिनेत्री म्हणून ओळख असणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बिग बॉस मराठी मध्ये धुमाकूळ घातले होते. आता राखीने instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर लग्न केल्याचे बोलले जात आहे. राखीने स्वतः त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि त्याचबरोबर आदिलने हे लग्न लपवण्यास सांगितले होते हे देखील तिने सांगितले. (Rakhi Sawant)

 

यावेळी राखीने instagram वर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये राखी आणि आदिल गळ्यात वरमाला घालून हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन दिसत आहेत. या मॅरेज सर्टिफिकेट वर 29 मे 2022 अशी तारीख दिली आहे. याचा अर्थ राखी आणि आदिलचे सात महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. राखीचे हे दुसरे लग्न आहे आणि नुकतेच तिने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. (Rakhi Sawant)

 

पोस्ट शेअर करत राखीने म्हटले की, “मी आणि आदिल ने सात महिन्यापूर्वीच लग्न केले होते.
आम्ही कोर्टात रजिस्टर लग्न केले आणि त्यानंतर निगाह केला. आदिलने हे लग्न मला लपून ठेवायला सांगितले होते.
त्यामुळे मी याबद्दल कोणालाही काही बोलले नव्हते.
मात्र आता माझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे मला हे सांगणे गरजेचे होते.
आदिलला असे वाटत होते की माझे त्याच्याशी लग्न झाले हे कळाले तर त्याच्या बहिणीला कोणी मुलगा देणार नाही आणि त्यामुळे तिच्या लग्नात अडथळा निर्माण होईल.
माझे नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं तर त्याची बदनामी होईल असे त्याला वाटत होते.
म्हणून त्यांनी मला लग्न लपवण्यासाठी सांगितले होते”.
याअगोदर राखीने 2019 मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेश बरोबर लग्न केले होते.
यानंतर दोघेही बिग बॉस मध्ये दिसले. मात्र 2022 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि
त्याच वर्षापासून राखी आणि आदिलने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

 

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant adil khan marriage says we had nikah but he forced me to hide for this reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा

Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणातील गुंडावर विनयभंगाचा गुन्हा; भर रस्त्यात तरुणीबरोबर अश्लिल चाळे

Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…