Rakhi Sawant | “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतने केला मोठा खुलासा

ADV

पोलीसनामा ऑनलाइन : Rakhi Sawant | सध्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीचे चौथे पर्व दिवसेंदिवस प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता शेवटचे दोनच आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धक अथांग प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळीमध्ये रंजकता देखील दिसत आहे. काही आठवड्यापूर्वीच या घरात राखी सावंतने (Rakhi Sawant) एन्ट्री घेतली होती.

राखीने एन्ट्री घेताच अनेक कारणांमुळे ती चर्चेत आली होती. या ना त्या गोष्टींवरून वाद निर्माण करून ती घरातल्या सदस्यांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेत होती. तर राखी घरातील सदस्य आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कमी पडताना दिसत नाही. राखीचा जन्म जरी सामान्य घरात झाला असला तरी तिने तिच्या कर्तुत्वाच्या बळावर बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

ADV

आज राखीचे (Rakhi Sawant) अनेक फॅन्स देखील आहेत.
परंतु राखी हे तिचे खरे नाव नसल्याचा खुलासा राखीने बिग बॉसच्या घरात केला.
यावेळी बोलताना राखी म्हणाली की, “राखी हे नाव महेश मांजरेकर सरांनी मला दिला आहे.
सुरुवातीच्या दिवसात मी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा शूटिंग दरम्यान मांजरेकर
सरांनी मला माझे नाव बदलून ‘राही’ व ‘राखी’ यापैकी एक नाव निवडायला सांगितले त्यावेळी मी माझे नाव
राखी निवडले “असे ती म्हणाली. बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्रात येताच त्यांचे
नाव बदलले आहे. राखीचे खरे नाव ‘नीरू भेडा’ असे आहे. राखी बिग बॉस मराठी चौथ्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी
शर्तीचे प्रयत्न करत आहे.

Web Title :-Rakhi Sawant | rakhi sawant says mahesh manjarekar changed my name reveals her real name in bigg boss marathi 4 house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPFO Alert | ६ कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली महत्वाची माहिती, अजिबात करू नका हे काम

Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु