‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतचं लग्न मोडलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत इंस्टाग्रामवर सतत अॅक्टीव असते. नुकतेच राखीचे रडण्याचे आणि ती नाराज असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. परंतु हे राखीचे फोटो नव्हते तर एका कार्टुनचे फोटो आहेत. परंतु हे फोटो राखीनेच इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

नुकत्याच लग्न झालेल्या राखीचे असे फोटो शेअर केलेले पाहून चाहते चकित होणं हे साहजिक आहे. राखीचे हे इमोशनल फोटो पाहून चाहते अंदाज लावत आहेत की, तिच्या वैवाहित जीवनात काही अडचणी सुरु आहेत. परंतु चाहत्यांनी कोणताही अंदाज लावण्याआधी राखीनेचा या फोटोमागील सत्य सांगितले आहे.

रडणाऱ्या मुलीचा फोटो शेअर करत तिने म्हटले की, “लंडनचं तिकीट खूप महाग आहे. म्हणून रडत आहे. राखीच्या या पोस्टवर चाहत्यांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, “राखीचा घटस्फोट झाला असेल.”

एकाने राखीला चिमटा काढत म्हटले आहे की, “आता म्हणेल की, लग्न मोडलं. हे सगळ प्लॅन होतं. लोकं वेडे थोडेच आहेत.” नुकतेच राखीने लंडनला एकटीच हनीमूनला जाण्याबाबत सांगितले होते. याबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. परंतु आता ती तिकीट महाग असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे तिच्या लंडन ट्रीपवर संस्पेस कायम आहे.

View this post on Instagram

Having fun with my love 😍 getting crazy 😜

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like