मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय रकुल प्रीत सिंह ! शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनी फोटो

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार रकुल प्रती सिंह (Rakul Preet Singh) हिनं बॉलिवूडपासून तर साऊथपर्यंत आपली ओळख तयार केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं बिकिनीतल्या एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. तिनं याआधीही अनेक बिकिनीतील फोटो शेअर केले होते. रकुलचा बिकिनी लुक असो किंवा मग, ग्लॅमरस लुक असो किंवा आणखी कोणता लुक ती नेहमीच चर्चेत येत असते. पुन्हा एकदा काही व्हॅकेशन फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे.

रकुलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. यात ती मालदीव व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. काही फोटो रकुल बोल्ड बिकिनीत दिसत आहे. तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.

काही फोटोत ती अंडरवॉटर डायव्हींग करताना दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. काहींनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल. गिल्ली या कन्नड सिनेमातून तिनं फिल्मी प्रवास सुरू केला होता. 2014 साली आलेल्या यारियां सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.

You might also like