अभिनेत्री रकुल प्रीतनं सोडला ‘मांसाहार’, सनी लिओनीनं घेतली शपथ ‘लेदर प्रॉडक्ट वापरणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस रकुल प्रीत सिंह आणि सनी लिओनीनं एक निश्चय केला आहे. रकुलनं मांसाहार सोडून वीगन बनण्याचा निर्णय घेतला आहे तर सनीनं लेदर प्रॉडक्ट वापरणार नाही असं ठरवलं असून चाहत्यांनीही याचा वापर टाळावा असं अपीलंही तिनं चाहत्यांना केलं आहे.

प्युअर व्हेज डाएट करण्याबद्दल सांगताना रकुलनं सांगितलं की, तिच्या आयुष्यातील हा एक मोठा निर्णय आहे. रकुल म्हणाली, “मला हिरव्या भाज्या आवडतात. माझ्या जेवणात नेहमीच मटणाचा समावेश होता. मी एक मोठी मांसाहारी होते. एक दिवस अचानक मी वेगन बनण्याचा निर्णय घेतला. आता मला हलकं आणि ऊर्जावान आणि उत्साही वाटत आहे.”

सनीनं केलं चामड्याचा त्याग करण्याचं अपील
सनी लिओनीनं लॅक्मे फॅशन वीकदरम्यान जनावरांसोबत होणारी क्रूरता दाखवणारी पेटाची एक अ‍ॅड दाखवली. सनी म्हणाली, “आपल्याकडे घेण्यासाठी कितीतरी वीगन शुज, बॅग आणि जॅकेट्स आहेत. असं सगळं असतानाही आपण पर्यावरणाचं नुकसान करण्यात आणि अ‍ॅनिमल स्किन घालण्यात काहीच अर्थ नाही. चामड्याचं सामान बनवण्याची भयानक स्टोरी ऐकल्यानंतर मी जनावरांना वाचवण्याचा निर्णय घेतला आहे.” सनीनं आपल्या चाहत्यांनाही लेदरच्या वस्तूंचा त्याग करण्याचं अपील केलं आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल प्रीत नुकतीच शिमला मिर्च सिनेमात दिसली होती. या सिनेमात हेमा मालिनी आणि राजकुमार राव हेदेखील होते. सध्या रकुल आपला आगामी सिनेमा अटॅकच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

You might also like