टीव्ही अभिनेता राम कपूरचं ‘शॉकिंग’ ट्रान्सफॉर्मेशन, ओळखणंही होतंय ‘अवघड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अॅक्टर राम कपूर काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या कर ले तू भी मोहब्बत या शोमध्ये दिसला होता. राम कपूरने मागील वर्षी आलेल्या आयुष शर्माच्या लवयात्री या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानंतर राम कपूर जास्त चर्चेत आला. आता पुन्हा एकदा राम कपूर चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे त्याचे फोटो आहेत.

राम कपूरने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्याचेच काही फोटो समोर आले असून व्हायरल होत आहे. पहिल्यांदा पाहिलं तर रामला ओळखणंही अवघड होत आहे. रामने वजन तर कमी केलंच आहे सोबत त्याने आपल्या लुकवरही खूप काम केलं आहे. त्याची शार्प चिन शानदार पर्सनॅलिटीला कॅम्प्लिमेंट देत आहे.

https://www.instagram.com/p/BxxD1GVANtC/

राम कपूर टीव्ही इंड्स्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे.त्याने इंडस्ट्रीतील त्या स्टेरियोटाईपला तोडलं होतं, ज्याच्यामते केवळ फिट स्टारच लीड रोल करू शकतो. राम कपूरने वजन वाढलेले असूनही टीव्ही क्षेत्रात सुपरहिट शोमध्ये लीड रोल प्ले केला आहे.

राम कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फिटनेसवर काम करत आहे. त्याने सोशल मीडियावर २०१७ साली जिम मध्ये घाम गाळताना अनेक फोटो शेअर केले होते.

राम कपूरने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. त्याचे लेटेस्ट फोटो या गोष्टीचा पुरावा आहे. त्याचा फिटनेस चाहत्यांसाठी इंस्पिरेशन ठरत आहे.

आपल्या लुकबाबत बोलताना एका मुलाखतीत राम कपूर म्हणाला होता की, “१८ वर्षांपासून मी इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मला कधीच कसला प्रेशर आला नाही. इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड येतात आणि जातात. कोणीच लाँग टाईमसाठी टिकत नाही. मी आतापर्यंत इथे आहे ही देवाची कृपा आहे.”

 

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?