Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेले काही दिवस तमिळनाडूपासून श्रीलंकेला जोडणारा रामसेतू (Ram Setu) याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. काहींच्या मते रामसेतू अस्तित्वात होता, काहींच्या मते तो नाही. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा रामसेतू नावाचा चित्रपट देखील आला होता. हा चित्रपट फार चालू शकला नाही. रामायणातील दाव्यानुसार हिंदू देवता प्रभू रामचंद्र यांनी सीतेला रावणाच्या लंकेतून सोडविण्यासाठी रामसेतू बांधला होता. त्यांना देवता हनुमान आणि वानरसेनेने मदत केली होती. मात्र, आता हा पूल खरेच अस्तित्वात होता, की ती एक दंतकथा आहे, यावरून रामसेतू (Ram Setu) चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रतिपादन केले आहे.

हरियाणातील भाजपा खासदार कार्तीकेय शर्मा यांनी यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. भारताच्या इतिहासातील गोष्टींची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी राम सेतूचाही उल्लेख आवर्जून केला. त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, तो राम सेतू आहे, की इतर कोणते बांधकाम आहे, याविषयी खात्रीशीर दावा करता येणार नाही. ते कठीण आहे. पण रामसेतू संदर्भात बोलायचे झाले, तर त्यात आमच्या काही मर्यादा आहेत. कारण यासंदर्भातला इतिहास जवळपास 18 हजार वर्षांपूर्वीचा आहे आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी 56 किलोमीटर इतकी आहे. त्याठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचे सातत्य आपल्याला दिसून येते. त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील.

जितेंद्र सिंह यांनी दिलेले उत्तर संदिग्ध असून, त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही,
असे संसदेतील इतर खासदारांचे मत आहे. तसेच या रामसेतूवर संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती असून,
काहींनी याचा अर्थ तिथे राम सेतू असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे सरकारचे म्हणणे असल्याचा निष्कर्ष काढला.
तर काहींच्या मते, तिथे राम सेतू होता, याची चिन्ह दिसल्याचा सरकारचा दावा आहे.

Web Title :- Ram Setu | does ram setu really exist cabinet minister jitendra singh in rajya sabha answer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग