मस्जिद रोडवर ‘जय श्रीराम’ म्हणण्याची ‘त्यांनी’ केली ‘सक्‍ती’, चाच्यांनी तर चक्‍क रामायणातील ‘भजन’च गायलं

जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास सांगितलेल्या वृद्धाने चक्क रामायणातील भजन गायले !

रांची : वृत्तसंस्था – देशामध्ये जय श्रीराम घोषणा देण्याची सक्ती केली जात असताना या दरम्यान आता एक नवीनच प्रकरण समोर आले आहे. नुकतेच झारखंड राज्यात जय श्रीराम बोलण्याची सक्ती करून एका मुस्लिम युवकाला मारहाण करण्यात आली होती. त्याच राज्यातील ही घटना आहे. काही युवकांनी एका वयस्कर फळविक्रेत्याला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली आणि त्या वृद्धाने चक्क रामायणातील भजन गायले.

ही घटना झारखंड राज्यातील जामताडा येथील आहे. रविवारी मस्जिद रोडवर फळविक्री करणाऱ्या एका वृद्धाजवळ एक कार येऊन थांबली. यानंतर कारमधील युवकांनी त्या वृद्धाच्या गाड्यावर आक्षेप घेतला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी जय श्रीराम घोषणा त्या वृद्धाला द्यायला सांगितली. यानंतर त्या वृद्धाने जे ऐकवले ते ऎकून युवकांनी तोंडात बोटे घातली.

खरं तर, वृद्धाने त्या युवकांना रामायणातील भजन ऐकवले. वृद्धाने म्हंटले, बैर न कर काहू सन कोई, राम प्रताप विषमता खोई. ‘वृद्धाचे हे भजन एकूण युवकांचे धाबे दणाणले. त्या ठिकाणी गर्दी जमायला सुरवात होताच युवकांनी तेथून पलायन केले.

या वृद्धाचे नाव मोहनलाल असून युवकांनी त्यांना मुस्लिम समजून जय श्रीरामचे नारे देण्यास सांगितले. समाजातील शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत त्या वृद्धाने व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, युवक कारमधून उतरले आणि गाडा हटविण्यास सांगितले. त्यानंतर जय श्रीराम घोषणा देण्यास सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर प्रकरणाचा तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमधील युवकांचा तपास पोलीस करत आहेत.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’