Indian Railway : IRCTC द्वारे करा नवीन वर्षात ‘रामायण यात्रा’, सुरुवातीचे पॅकेज 5670 रुपयांचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षानिमित्त तुम्ही धार्मिक पर्यटन करू शकता. देशातील सर्वात मोठी रेल्वे कंपनी नागरिकांना नव्या वर्षात अनेक ठिकाणी धार्मिक यात्रा करण्याची संधी देत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) नवीन वर्षात देशात श्रीरामपथ गमन, मल्लिकार्जुन आणि गंगासागरसह अनेक धार्मिक स्थळांची यात्रा घडवणार आहे. आयआरसीटीसीचे म्हणणे आहे की, या पॅकेजचे नाव रामायण यात्रा असेल.

इंदौरहून सुरू होईल यात्रा
ही यात्रा इंदौरहून सुरू होईल आणि यात्रेकरूंना अयोध्या आणि चित्रकूटपर्यंतचा प्रवास घडवला जाईल. या पॅकेजमध्ये प्रवासी थर्ड एसीपासून स्लीपर क्लामध्ये सुद्धा प्रवास करू शकतात. यात्रा 26 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 3 मार्चला समाप्त हेाईल. पाच वर्षाखालील मुलांना तिकिट घ्यावे लागणार नाही.

असे असेल भाडे
या पॅकेजमध्ये 6 दिवस 5 रात्रीत प्रवास पूर्ण होईल. इंदौरशिवाय लोक देवास, उज्जैन, शुजालपुर, सीहोर, संत हीरदाराम नगर, विदिशा, बीना आणि झांसीहून सुद्धा पॅकेज बुक करू शकतात. पॅकेजनुसार अयोध्या, नंदीग्राम, प्रयाग, चित्रकूट येथे प्रवाशांना फिरता येईल.

पॅकेजमध्ये हे असेल
या पॅकेजमध्ये प्रवाशांना नाश्ता, लंच आणि डिनर मिळेल. स्लीपर क्लासच्या प्रवाशांकडून 5670 रुपये प्रति प्रवासी आणि थर्ड एसीमध्ये 6930 रुपये प्रति प्रवासी घेतले जातील. नाईट स्टेसाठी प्रवाशांसाठी हॉलमध्ये व्यवस्था केली जाईल.