जाणून घ्या ‘राम्बुतान’ फळाचे ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मलेशियाच्या राम्बुतान या फळाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. याला केसासारखं काटेरी आवरण असतं. राम्बुत म्हणजे केस. हे फळ थायलंडमधून सप्टेंबर मध्ये भारतात येतं. तसं पाहिलं तर आतून हे फळ लिची प्रमाणेच रसाळ आणि पांढरं दिसतं. याचा हा आतील गर थोडा आंबड, गोड लागतो. हे एक औषधी फळ मानलं जातं. आज आपण याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

1) लहान मुलांमध्ये जर जंताची तक्रार असेल तर हे फळ गुणकारी ठरतं.

2) यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं अस्थिरोगात पेशींचं निकामी होणं आणि सूज कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

3) इतर कोणत्याही फळापेक्षा यात तांब्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं केस गळती कमी करण्यासाठी, केसांचा रंग गडद करण्यासाठी आणि कमी वयात केस पांढरे होण्याची तक्रार दूर करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

4) यात फॉस्फरस असतं. त्यामुळं रात्री पायाला गोळे येण्याची समस्या असणाऱ्या वृद्धांसाठी याचा फायदा होतो. अशा व्यक्तींना हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.