‘या’ 5 राज्यातील निवडणुकांसाठी रिपाइं रिंगणात – रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   येत्या वर्षभरात 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार आहे अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रिपाइं ला 3-4 जागांवर तिकिट मिळावं यासाठी लवकरच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहोत, तसंच शक्य होईल तिथं भाजपला पाठींबा देऊ असंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

येत्या वर्षभरात 5 राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम पहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू, पाँडिचेरी या 5 राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्षांची यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशात आता रामदास आठवले यांनी या 5 राज्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

‘शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बिळात’

पुढं बोलताना रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांबाबत जे बोलले त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्यात दोघांत मुख्यमंत्रिपदाची चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. आता शिवसेना मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.