Ramdas Kadam | शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले – ‘सर्व बंडखोर नेत्यांनीच…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ramdas Kadam | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप आज शिवसेना नेते (Shivsena Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले की, शिवसेनेच्या सर्व बंडखोर नेत्यांनीच शिवसेना फोडली. त्यांनी मातोश्रीसोबत दगाफटका केला. ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि याचे खापर जाणून बुजून राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडण्याचा केविलवाणा प्रकार करत आहेत.

 

तपासे म्हणाले, संपूर्ण देशाला माहिती आहे की 2019 च्या निवडणुकीनंतर स्वतः शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांची मोट बांधली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींनाही यात सामील करून घेतले. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आले. स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले. त्यांनी चांगला कारभार केला. त्यामुळेच देशातील टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आले.

 

शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरे यांना सोडून जात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना मानते. आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांसोबत आहोत. (Ramdas Kadam)

तपासा पुढे म्हणाले की, शिंदे गटाने शिवसेना फोडली. परंतु त्यामागील खरे सूत्रधार भाजपा आहे.
2019 ला सत्तेबाहेर राहावे लागल्याचा राग भाजपाच्या मनात आहे. त्या रागातूनच भाजपाने शिवसेना फोडली.
यासाठी पोलिसी बळाचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर केला.तपासे म्हणाले, महाराष्ट्रातील शिवसैनिक हे सर्व पाहात आहे.
ज्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिले, आज तेच लोक मातोश्रीचे गद्दार झाले आहेत.

 

Web Title :- Ramdas Kadam | ncp answer allegations of ramdas kadam over shivsena rebel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती ओळख

 

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)