V V Karmarkar Passes Away | मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई  : V V Karmarkar Passes Away | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक विष्णु विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे राहत्या घरी निधन झाले (V V Karmarkar Passes Away). मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांना संबोधले जात असे. ते ८५ वर्षाचे होते. (Sports Journalist V V Karmarkar Death News)

वि. वि. करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांचे वडिल डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. त्यांनी अर्थशास्त्रात एम ए केले होते. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात नाशिकमधील रसरंग साप्ताहिक आणि एस एस जोशी चालवत असलेल्या दैनिक लोकमित्र म्हणून त्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे ते जून १९६२ मध्ये प्रमुख झाले. (V V Karmarkar Passes Away)

वृत्तपत्रात क्रीडासाठी स्वतंत्र पान देण्याची सुरुवात त्यांनी केली. पत्रकारिता खेळाच्या बातम्या, क्रीडा समीक्षणे, स्तंभ लेखनातून त्यांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्व वृत्तपत्रात खेळासाठी स्वतंत्र  व हक्काचे पान उपलब्ध झाले.

पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराची करमरकर यांनी पोलखोल केली.
यामुळे त्यांच्यावर सुरेश कलमाडी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
पण यामुळे न डगमगता करमरकर यांची लेखणी आणखी टोकदार केली.
आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर त्यानी अनेक विविध खेळाचे धावते समालोचन केले.
ऑलिपिंक, आशियाई स्पर्धांना मराठी क्रीडा पत्रकारांना परदेशात जाण्याची संधी मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

Web Title :-V V Karmarkar Passes Away | Sports Journalist V V Karmarkar Death News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra BJP | ‘उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या, शिमग्याच्या बोंबा पुरे आता…’, उद्धव ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर…’, मोदींच नाव घेत भाजप- शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी दिलं खुलं आव्हान

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा…’, भास्कर जाधवांचा इशारा