Ramdas Kadam | ‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही’ – रामदास कदम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेली 52 वर्षे मी शिवसेनेसाठी (Shivsena) झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, अशा शब्दांत बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास कदम हे एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी रामदास कदम (Ramdas Kadam) अक्षरश: ढसाढसा रडले.

 

बाळासाहेबांनी हिंदुत्व (Hindutva) वाढवलं. ही बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शिवसेनेची नाही, शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला, असं म्हटलं आहे. उद्धव (Uddhav Thackeray) साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पहा… कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले… मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो… प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे, असं देखील रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलं आहे.

 

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मी 52 वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केले. राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा (Resignation) देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हाता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचं भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल असे वाटले नव्हते, असे कदम म्हणाले.

मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता.
तुम्ही इकडे या, आपण बसून, बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, ही माझी अपेक्षा होती.
पण उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली.
आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरु नये, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

 

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam slams sharad pawar and shivsena uddhav thackeray over political situation in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Cyber Crime | आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह 4 भाजप महिला आमदारांची फसवणूक

 

Pune Accident News | दुर्दैवी ! लेकीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना हडपसारमध्ये अपघात, बाप लेकीचा जागीच मृत्यू

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर