देशाच्या लोकसंख्यावाढीवर योगगुरू रामदेव बाबांचा ‘हा’ नामी सल्ला ; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर चीनचा पहिला क्रमांक लागतो. पण योगगुरू रामदेव बाबा यांनी त्यावर उपाय सुवाचवला आहे. भारतात वाढणारी लोकसंख्या हा चिंतेचा विषय असून जर लोकसंख्या नियंत्रणात आली नाही तर मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल अशी चिंता रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे.

लोकसंख्या वाढीबाबत बोलताना रामदेव बाबांनी एक नामी उपाय शोधून काढला आहे. दोन मुलांव्यतिरिक्त तिसऱ्या मुलाने कुटुंबात जन्म घेतला तर त्या तिसऱ्या अपत्याचा मतदानाचा हक्क काढून घेता येईल. तसेच त्याच्यावर निवडणूक लढवण्यास देखील बंदी घालावी आणि त्याला सर्व सरकारी फायद्यांपासून मुक्त ठेवावे. असा सल्ला योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. याशिवाय लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी त्यांनी कायदा करण्याचेही सुचविले आहे.

यावेळी पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले, ” भारताची लोकसंख्या १३० कोटींवर गेली आहे. यामुळे लोकांना सोई सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सोई पुरविण्यासाठी आपला देश तयार नाही. तसेच पुढील ५० वर्षात भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या पुढे जाता कामा नये अन्यथा मोठ्या समस्या निर्माण होतील असा इशारा रामदेव बाबा यांनी दिला आहे.

सध्या तिसरे अपत्य असल्यास निवडणूक लढविण्यावर बंदी आहे. एखाद्याने तिसरे अपत्य असूनही ग्रामपंचायतची निवडणूक लढविल्यास त्याचे सदस्यपद बरखास्त केले जाते.

Attachments area