राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, हिंदू व मुस्लिमांचा DNA एकच : योगगुरू रामदेव बाबा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – आंतराराष्ट्रीय योग दिवसानिमित्त रामदेव बाबा नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याना योगा शिकवत योगाभ्यास केला. त्यानंतर त्यांनी राम मंदिराबाबात आपले मनोगत व्यक्त केले. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच असल्याचंही रामदेव बाबा म्हणाले. हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असून राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असं रामदेव बाबांनी यावेळी सांगितलं.

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी सरकार कायदा करत आहे. तसंच राम मंदिर बनवण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी लोकांची मागणीही आहे, असं त्यांनी सांगितलं. तसंच श्रीराम हे प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. ते हिंदूंचे आणि मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. मुस्लिम बांधव सौदी अरबमधून आलेले नाहीत. ते आपलेच बांधव आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच असल्याचंही रामदेव बाबा म्हणाले. हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असून राम मंदिर बनवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

राम मंदिर हा भारतीय जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल. राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर हे आम्ही मक्केत किंवा व्हॅटीकनसिटीमध्ये बांधा असं म्हणत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राम मंदिर उभारणीसाठी आता कोर्टात मुद्दा सुरु आहे. यासाठी मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्याकडून काही होईल असे वाटत नाही, असं म्हणत त्यांनी अविश्वास दाखवला. तसंच एकतर सरकारने यासाठी कायदा करावा अन्यथा लोकांनी स्वतःहून राम मंदिर बांधायला सुरुवात करावी. असे दोनच पर्याय आहे, असं त्यांनी सांगितलं. तसच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात राम मंदिर उभारले जाईल, असा विश्वासही बोलून दाखवला.

आरोग्यविषयक वृत्त –

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण