रामटेक लोकसभा मतदारसंघ ; काँग्रेसचा गोंधळ तुमानेंच्या पथ्यावर ; उत्तम संपर्काचा तुमानेंना फायदा

पोलिसनामा ऑनलाईन टीम : रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी पुन्हा एकदा विजयी पताका फडकावली आहे. येथे शिवसेनेच्या कृपाल तुमाने विरुद्ध काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट लढत होत झाली.

गेल्यावेळेस कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभव करत काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे यावेळेस कृपाल तुमाने यांनाच युतीकडुन उमेदवारी देण्यात आली. कृपाल तुमाने पुन्हा बाजी मारत शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. उमेदवारी देताना काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्यावरून उडालेल्या गोंधळामुळे गटबाजी पहायला मिळाली. त्या गटबाजीचा फटका काँग्रेसला बसल्याचे दिसून आले.

कृपाल तुमाने यांच्या विजयाची कारणे –

मतदारसंघात उत्तम संपर्कगेल्यावेळेसचे पराभूत उमेदवार मुकूल वासनिक मतदारसंघात फिरकले नाहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात केलेली रस्त्यांची विकास कामे मित्र पक्ष भाजपची उत्तम साथ

किशोर गजभिये यांच्या पराभवाची कारणे – वासनिक यांच्या पुढाकाराने गजभिये यांना उमेदवारी मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्याने मतदारसंघात सर्वत्र फिरता आले नाही भाजप शिवसेनेच्या प्रचारासपुढे काँग्रेसचा प्रचार कमी पडला गजभिये यांचा २०१८ ला नुकताच झालेला काँग्रेस प्रवेश २००९ मध्ये निवडून आल्यानंतर २०१४ मध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक यंदाही रामटेकमधून लढण्यास इच्छुक होते.

त्यांच्या कार्यकर्त्यांनीही तसा जोर लावला होता. पण काँग्रेसमधल्या इतर गटांचा विरोध पाहून स्वतः वासनिकांनीच आपली तलवार म्यान केली होती. मुकुल वासनिक यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते. कृपाल तुमाने मतदारांशी सातत्याने संपर्कात होते, त्याचा फायदा तुमाने यांना झाल्याचे दिसून येते.

किशोर गजभिये यांनी २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बसपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रामटेक लोकसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.