पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) हा एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला आहे. आज राणाचे अनेक चाहते देखील आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आज राणा लोकप्रिय आहे. याआधी देखील राणाने ‘दम मारो दम’ सारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. मात्र बाहुबली मुळेच त्याला चांगली पसंती आणि ओळख मिळाली आहे. बाहुबलीमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर राणा (Rana Daggubati) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राणा आता पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे राणा लवकरच ओटीटीविश्वात पदार्पण करण्यासाठी तयार आहे. ‘राणा नायडू’ या नव्या कोऱ्या वेब सिरीज मधून राणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसाईटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वेब सिरीजची कथा बॉलीवूडचे सेलिब्रिटी संकटात अडकल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी राणा पुढे सरसावत असतो अशी असणार आहे. हि एक ॲक्शन ड्रामा वेबसिरीज आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेब सिरीज चा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलीच पसंती दर्शवली आहे. तर या वेब सिरीजची निर्मिती करण अंशुमन यांनी केली आहे. ज्यांनी या आधी देखील ‘इनसाइड एज’, ‘मिर्जापुर’ या वेब सिरीज वर काम केले होते. या वेब सिरीजचे दिग्दर्शन करण आणि सुपर्ण वर्मा यांनी केले आहे. या वेब सिरीज मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार वेंकटेशसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या वेब सिरीजमध्ये व्यंकटेश राणाच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या वेब सिरीज बाबत बोलताना राणा (Rana Daggubati) म्हणाला, “बऱ्याच दिवसापासून या प्रोजेक्टवर काम सुरू होते.
मी यासाठी खूपच उत्सुक आहे. प्रथमच मी नेटफ्लिक्स बरोबर काम करत आहे मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि उत्साही बाब म्हणजे पहिल्यांदाच माझे काका वेंकटेश यांच्याबरोबर मी काम करणार आहे.
या प्रोजेक्टमध्ये काम करणं हे खूपच अप्रतिम अनुभव होता. या कलाकारांकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे.
प्रेक्षकांना देखील ही वेब सिरीज नक्की आवडेल याची मला खात्री आहे”.
तर येत्या 10 मार्चपासून नेटफ्लिक्स या ओटीपी प्लॅटफॉर्मवर ही वेब सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Web Title : – Rana Daggubati | rana daggubati and venaktesh starrer rana naidu upcoming rana naidu trailer series from netflix
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका
Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना