Ranbir Kapoor And Deepika Padukone | ‘कोणत्या मुलीसाठी आपल्या गर्लफ्रेंडला सोडणे योग्य आहे का?’ रणबीरचे उत्तर ऐकून दीपिकाच्या चेहऱ्यावरचे बदलेले हावभाव, व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – एकेकाळी बी टाऊनमधील सुप्रसिद्ध कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री दीपिका पादुकोण (Ranbir Kapoor And Deepika Padukone) हे अनेक वर्षे एकमेंकांच्या प्रेमात होते. त्यांची ऑनस्क्रीन जोडी तसेच ऑफ स्क्रीन कैमिस्ट्री चाहत्यांना पसंत पडत होती. मात्र त्यांचे हे नाते अतिशय वाईट पद्धतीने संपुष्टात आले. आता दीपिका अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) तर रणबीर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहे. मात्र आता रणबीर व दीपिकाचा (Ranbir Kapoor And Deepika Padukone) जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रणबीर इतर मुलींसाठी आपल्या गर्लफ्रेंडला सोडू नये असे सांगत असून यावेळी दीपिकाने दिलेले एक्सप्रेशन सर्वांचे लक्ष वेधत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

रणबीर कपूर व अभिनेत्री दीपिका पादुकोण हे एकमेंकांच्या प्रेमात बुडाले होते. ते अनेक ठिकाणी एकत्र दिसून (Ranbir And Deepika Photo) येत होते. मात्र रणबीर कपूरने अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) साठी दीपिकाला सोडले होते. हे रणबीरने एका मुलाखती दरम्यान मान्य देखील केले होते. रणबीर व दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’ (Ye Jawani Hai Deewani) या चित्रपटादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी होस्टने त्याला कोणी दिल्लीवाली गर्लफ्रेंड आहे का आणि कोणत्या मुलीसाठी आपल्या गर्लफ्रेंडला सोडणे योग्य आहे का असा प्रश्न केला होता. यावर रणबीर जे उत्तर दिलं ते दीपिका लक्ष देऊन ऐकत होती. रणबीर म्हणाला की, “माझी कोणतीही दिल्लीवाली गर्लफ्रेंड नाही. आणि दुसऱ्या मुलीसाठी आपल्या गर्लफ्रेंडला धोका देणे योग्य नाही. पण ते सिच्युवेशनवर देखील डिपेंड आहे.“ रणबीरचे हे उत्तर अभिनेत्री दीपिका पादुकोण लक्ष देऊन ऐकत होती. त्यानंतर तिने डोळ्याने असे काही एक्सप्रेशन दिले त्याने सोशल मिडियावर ही व्हिडिओ व्हायरल झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

रणबीरच्या या जुन्या व्हिडिओला ट्रोलर्सने व्हायरल केले असून लोक आता रणबीरला ट्रोल करत आहेत. मात्र दीपिका व रणबीर (Ranbir Kapoor And Deepika Padukone) आयुष्यामध्ये खूप पुढे गेले असून आता ते दोघे आपले वैवाहिक आयुष्य जगत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही यशाच्या शिखरावर असून लवकरच ती ‘जवान’ चित्रपटामध्ये (Jawan Movie) झळकणार आहे. तसेच दीपिका ‘प्रोजेक्ट के’ (Project K) व ‘फायटर’ (Fighter) या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. रणबीर कपूरचा देखील ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता त्याचा ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यामध्ये रणबीर व सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

 

 

 

 

 

Web Title :  Ranbir Kapoor And Deepika Padukone | ranbir kapoor said its not right to leave to your girlfriend for another girl deepika padukone reaction grabs attention viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका