रणबीरच्या हृदयात आजही ‘त्या’ दोघींसाठी ‘धक धक’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता रणबीर कपूरचे इंस्टाग्रामवर अकाउंट नाही परंतु सोशल मीडियावर त्याची घारी सारखी नजर असते. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार एका इव्हेंट मध्ये कळाले की रणबीर कपूर सोशल मीडियावर एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण आणि कटरीना कैफ यांना फोलो करतो.

dipika

एवढेच नाही, रणवीर सिंह, अलीया भट्टच्या इंस्टाग्राम अकाउंट वर म्हणजे इमेज शेयरिंग वेबसाइट वर लक्ष ठेवत असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण रणबीर कपूरचे कुठल्याही सोशल मीडियावर अकाउंट नाही. यामध्ये त्याची बहीण करीना कपूरचे सुद्धा नाव आहे अंदाज लावला जात आहे की त्या दोघांचे प्राइवेट अकाउंट्स आहे आणि त्यावरून ते दुसऱ्यांच्या प्रोफाइल वर डोकावतात.

Katrina Kaif

अलीकडेच अरबाज खानच्या ऑनलाइन चॅट शो पिंचमध्येही कॅटरीना कैफने माहिती दिली होती की रणबीरचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. जेंव्हा कॅटरीनाला शो मध्ये प्रश्न विचारण्यात आला की अन्य बॉलीवूड स्टार्सच्या अकाउंटवर डोकावण्यासाठी तुमच्याकडे प्राइवेट सोशल मीडिया अकाउंट आहे. त्यावर तिने सांगितले ”माझा जवळ तर नाही पण रणबीर कपूर कडे आहे. त्याने मला सांगितले होते की इंस्टाग्राम कसे कार्य करते.

रणबीरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोन चा पती रणवीर सिंह सोबत गप्पा झाल्या आहेत. त्याचबरोबर रणबीरला आणि रणवीरला कारण जोहरच्या चाट शो मध्ये सोबत बघितले. याशिवाय रणबीर आणि आलिया अलीकडेच टेलिव्हिजन कमर्शियल एडमध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते. तसेच त्या दोघांना अभिनेता कुणाल खेमूच्या वाढदिवसात देखील सोबत बघितले होते.