Randeep Hooda | रणदीप हु़ड्डा बनणार ‘स्वातंत्रसैनिक वीर सावरकर’ ! फर्स्ट लूक शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ..

पोलीसनामा ऑनलाईन टीम | अभिनेता रणदीप हु़ड्डा (Randeep Hooda) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. त्याच्या अभिनयानं तो चाहत्यांना आकर्षित करतो. पात्र मोठं असू किंवा छोटं आपल्या अभिनयानं तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. प्रत्येक पात्र करताना तो त्या पात्रामध्ये शिरून अभिनय करतो. त्याचा चाहता वर्ग मोठा असून, तो चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणताच बहाणा सोडत नाही. नुकतंच त्याचा एका आगामी चित्रपटाच फर्स्ट लूक त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे (Randeep Hooda).

रणदीप (Randeep Hooda) लवकरच एक ऐतिहासिक चित्रपट करणार असल्याची बातमी समाोर आली आहे. तो आता स्वातंत्रसैनिक विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) उर्फ वीर सावरकर (Randeep Hooda As Veer Savarkar) यांचा बायोपिक करणार आहे. तो आपल्या अभिनयाच्या जोरावर वीर सावरकरांची अजरामर गाथा जिवंत करणार आहे.

आनंद पंडित (Anand Pandit) यांनी सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर या चित्रपटाचा (Film On Veer Savarkar) फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यांनी रणदीपचा फोटो शेअर केलेला दिसत आहे. फोटोखाली त्यांनी रणदीप सावरकरांची भूमिका साकारत असल्याचं सांगितले आहे. या चित्रपटाची शूटिंग 2022 च्या जून महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार आहे. या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लंडन, अंदमान निकोबार बेट आणि महाराष्ट्र यांसारख्या विविध ठिकाणी होणार आहे.

 

 

Web Title :- Randeep Hooda | actor randeep hooda to play freedom fighter veer
savarkar the director of the film mahesh manjrekar confirmed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा