जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सहात साजरी

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन – अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर आज पहाटेपासूनच सदानंदाचा जयघोष करीत रंगोत्सव साजरा करण्यात आला. देवाचे स्वयंभूलिंग आणि मार्तंड भैरवाच्या मूर्तींना विधिवत दुध आणि नैसर्गिक रंगाचे स्नान घालण्यात आले. रंगस्नानानंतर कुलधर्म कुलाचाराप्रमाने पूजा, अभिषेक, भूपाळी गात मल्हारी म्हाळसाकांताची आरती करण्यात आली.

देवाचे, पुजारी, मानकरी, सेवक तसेच नेहमीच्या भक्तांनी रंगपंचमी यावेळी उत्सहात साजरी केली. पुण्यातील रंगावलीकार आशा खुडे यांनी उपस्थित राहत मल्हारी मार्तंड भैरवाची प्रोट्रेट रांगोळी काढून उत्सवात रंग भरले. यानंतर भाविकांनी एकमेकांच्या अंगावर रंग उडवीत सदानंदाचा जयघोष करीत रंगपंचमी उत्सहात साजरी केली.