PUNE : रांका ज्वेलर्सचे ११ वे दालन ३१ मार्च रोजी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात १८७९ पासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आणि नामवंत ज्वेलर्स अशी ओळख असलेले रांका ज्वेलर्सचे अकरावे दालन ३१ मार्च रोजी पिंपळे सौदागर येथे सुरु होत आहे. यानिमित्ताने रांका ज्वेलर्सने ग्राहकांसाठी दागिन्यांची मजुरी आणि हिरे याच्यावर सवलत योजना जाहीर केली आहे.

संचालक फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. यावेळी ओमप्रकाश रांका, डॉ.रमेश रांका, शैलेश रांका, तेजपाल रांका, वस्तुपाल रांका आदी उपस्थित होते. सराफी व्यवसायात रांका परिवाराची सातवी पिढी कार्यरत असून, पुणेकर ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासावरच ही वाटचाल सुरू आहे. असे स्पष्ट करीत रांका म्हणाले,” पुढील काळात कोंढवा, खराडी आदी भागात नवीन तीन दालने देखील सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची सर्व दालने म्हणजे एकाच ठिकाणी भारतातील सर्व प्रकारच्या कलाकुसरीचे सोने, चांदी ,प्लॅटिनम आधी धातूंचे दागिने, वस्तू,फर्निचर मिळण्याचे ठिकाण आहे. बदलती परिस्थिती आणि व्यवसायातील स्पर्धा लक्षात घेऊन आम्ही देखील व्यवसायात बदल केले आहेत. त्यानुसार सोन्याचे एक ग्रॅमचे दागिने देखील आम्ही विक्रीस ठेवले आहेत. पिंपळे सौदागर (कोकणे चौक) येथील नवे दालन सुमारे साडेआठ हजार चौरस फूट इतके मोठे आहे. या दालनाचे उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते न करता महिलांच्या हस्ते केले जाणार आहे. नवीन दालनाच्या शुभारंभानिमित्त आम्ही दागिन्यांच्या मजुरीवर सवलत योजना जाहीर केली आहे. रांका ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये ३१ मार्च ते बातमी ७ मे कालावधीत सोन्याच्या दागिन्यांची मजुरी प्रति ग्रॅम २११ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हिर्यांचा प्रति कैरेटच्या भावात सवलत देण्यात येणार आहे.”

देशात दरवर्षी सुमारे तेराशे इतका सोने विकले जाते. त्यापैकी साडेचारशे टन सोने हे मोडी चे असते. त्यापासून पुन्हा दागिने तयार केले जातात. देशातील सोन्याची उलाढाल लक्षात घेता महाराष्ट्र हा दुसरा किंवा तिसऱ्या क्रमांकावर असावा. महाराष्ट्रात पुण्यातील सोन्याची बाजारपेठ ही वाढली आहे. राज्यात सर्वात जास्त पुण्यात सोन्याची विक्री होते. पूर्वी खानदेशात सोने विक्री मोठी चालत होती, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.