Ranveer And Deepika | नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल केल्यानंतर तिने अखेर केली रणवीरसाठी स्टोरी शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचे बाजीराव मस्तानी अर्थात प्रसिद्ध कपल रणवीर सिंग व दीपिका पादुकोण (Ranveer And Deepika) हे कपल सध्या चर्चेत आहे. अभिनेता रणवीर सिंगचा नुकताच 38 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिनेता रणवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र त्याची जीवलग अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने रणवीरच्या वाढदिवसाबद्दल कोणत्याही शुभेच्छा दिल्या नव्हत्या. यावरुन दीपवीरच्या चाहत्यांनी दीपिकाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. (Ranveer And Deepika) चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्या नंतर दीपिका आता नवऱ्यावरचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.

https://instagram.com/stories/deepikapadukone/3141884017904682416?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

बॉलीवुडचे हे प्रसिद्ध कपल आपले प्रेम व्यक्त करायला कधीच मागे पडत नाहीत. मात्र वाढदिवसाच्या कोणत्याच प्रकारच्या शुभेच्छा न दिल्याने दीपवीरचे (Deepveer) चाहते नाराज झाले होते. आता अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर रणवीरची स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने रणवीरची वॉग मॅगझीनची (Vogue Magazine) एक पोस्ट स्टोरीमध्ये शेअर केली आहे. यामध्ये तिने ‘HELL YEA’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये रणवीरची हटके फॅशन (Ranveer Singh Fashion) स्टाईल दिसत असून त्यामध्ये रणवीरला भारतीय पुरुषांच्या फॅशन सेन्समध्ये सुधारणा करण्यासाठी धन्यवाद म्हणण्यात आले आहे.

अभिनेता रणवीर हा त्याच्या अतरंगी फॅशन साठी ओळखला जातो. त्याच्यासारखे फॅशनमध्ये प्रयोग बॉलीवुडमध्ये कोणताही नायक करत नाही. (Ranveer And Deepika) रणवीरचा लवकरच आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपट येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटासाठी चाहते उत्सुक असून याचे दिग्दर्शन करण जोहरने (Director Karan Johar) केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील बहुचर्चित असा ‘प्रोजेक्ट-के’ (Project K) मध्ये व हृतिक रोशन (Hrithik Roshan) सोबत ‘फायटर’ चित्रपटात (Fighter Movie) झळकणार आहे. तिचा शाहरुख (SRK) सोबतचा ‘पठान’ (Pathan Movie) चित्रपटही बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.

Web Title :  Ranveer And Deepika | deepika padukone cheers for ranveer singh on instagram story after ditching birthday post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध