Ranveer And Deepika | रणवीरच्या वाढदिवसाला सर्वांच्या शुभेच्छा पण दीपिकाने केली नाही कोणतीही पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – Ranveer And Deepika | बॉलीवुडचे फेवरेट कपल म्हणजे दीपवीर (Deepveer) हे त्यांचे प्रेम अनेकदा व्यक्त करताना दिसतात. अभिनेता रणवीर सिंगचा काल (दि.06) वाढदिवस साजरा झाला. सर्वांनी रणवीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. बी-टाऊन मधील कलाकारांनी रणवीर सोबतचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या सगळ्यामध्ये चाहत्यांना एक गोष्ट खटकली ती म्हणजे रणीवरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Ranveer And Deepika) त्याच्यासाठी कोणतीही सोशल मीडिया पोस्ट केली नाही. यावरून आता दीपवीरचे चाहते नाराज झाले आहेत.

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) व अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या कपलचा चाहता वर्ग मोठा आहे. या कपलचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ते एकमेंकांबद्दल प्रेम व्यक्त करताना कधीही मागे पडत नाहीत.(Deepveer Wedding) मात्र रणवीरच्या वाढदिवसादिवशी दीपिकाने रणवीरसाठी नाही कोणती पोस्ट टाकली ना कोणती स्टोरी टाकली. तिच्या या वागण्याचा नेटकरी विपरीत अर्थ काढत आहेत. दीपिकानं रणवीरच्या वाढदिवसाच्या एकदिवस आधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, रणवीरच्या वाढदिवसाच्या दिवशी दीपिका काहीतरी पोस्ट शेअर करेल म्हणून संपूर्ण दिवस तिचं अकाऊंट चेक करत होते. दुसरा नेटकरी म्हणाला, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्तानं काहीतरी पोस्ट शेअर करा. तर तिसरा नेटकरी म्हणाला, तू तुझ्या नवऱ्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली नाही?

अभिनेता रणवीर व अभिनेत्री दीपिका (Ranveer And Deepika) हे बी-टाऊन (B-Town News) मधील सुप्रसिद्ध कपल आहेत. (Bollywood Couple) त्यांच्यामधील प्रेम ते नेहमी व्यक्त करत असतात. मात्र बर्थ डे च्या दिवशीचे दीपिकाचे हे वागणे नेटकऱ्यांना आवडलेले दिसत नाही. रणवीरने 12 मे रोजी दीपिकासाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रणवीरनं दीपिकाचा टाइम्स मॅगझिनच्या कव्हर पेजवरील (Deepika On Times Magazine Cover Page) फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने कॅप्शन लिहिले होते की. “संपूर्ण जग हे तुझ्यापायाशी आहे. बेबी गर्ल तुझा खूप अभिमान आहे.” रणवीर सिंगचा लवकरच करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) रणवीर स्क्रीन शेअर करणार असून येत्या 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे

Web Title :  Ranveer And Deepika | deepika padukone skips birthday post for husband ranveer singh fans shocked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या वयावरुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

Pune: Newly-married girl ends life by jumping into Indrayani river; She was being harassed to get money from her parents’ house

Neelam Gorhe join Shivsena | नीलम गोऱ्हेंचा शिवसेनेत प्रवेश, फडणवीस यांची आश्चर्यकारक उपस्थिती (व्हिडिओ)

Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती

Pooja Hegde | अभिनेत्री पुजा हेगडेच्या हॉट फोटोशुटवर नेटकरी फिदा; बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो व्हायरल

Actress Madhoo | ‘रोजा’ सारखा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री मधूने अचानक का सोडली इंडस्ट्री; सांगितले खरे कारण

Katrina Kaif | कतरिनाचा चाहत्यांसोबत कूल अंदाज; नेटकरी करत आहेत कौतुक