रणवीर सिंहने वाढदिवसानिमित्त फॅन्सला दिली खास भेट, कपिल देवच्या लूकमधील फोटो पाहून फॅन्स थक्क

पोलीसनामा ऑनलाइन – रणवीर सिंहनी आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक अतिशय खास भेट दिली आहे. रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील रणवीरचा पहिला लूक त्यांनी चाहत्यांसाठी रिलीज केला आहे. या लूकमध्ये रणवीर सिंह हुबेहूब कपिल देव सारखे दिसत होते. हा चित्रपट १९८३ मध्ये झालेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देवची भूमिका साकारणार आहे.

या लूकमध्ये रणवीर पांढऱ्या जर्सीमध्ये हातात बॉल घेऊन उभे असताना दिसत आहे. या लूकला शेअर करत रणवीर ने लिहिले की, ‘माझ्या या खास दिवशी सादर करत आहे हरियाणाचा तुफान कपिल देव.’ चाहत्यांना रणवीरचा हा लूक खूपच आवडला आहे.

१९८३ मधील  क्रिकेट वर्ल्डकपमध्ये  भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवले होते. चित्रपटासाठी रणवीर खुपच कष्ट करत आहे. कपिल देवने स्वतः रणवीरला क्रिकेटची ट्रेनिंग दिली आहे. रणवीर ने कपिल देव सारखे दिसण्यासाठी त्यांच्या सोबत वेळ घालवला आणि त्यांच्या लहान लहान गोष्टीही शिकण्याचा प्रयत्न केला.

image.png
याआधीही रणवीरने कपिल देव सोबतचे फोटो शेअर केले होते. या चित्रपटात दीपिका पादुकोण पण दिसणार आहे. चित्रपटात दीपिका कपिल देवच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. कबीर खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदी भाषेसोबतच अन्य भाषांमध्ये ही रिलीज होणार आहे.

रणवीर सिंहचा ‘८३’ हा चित्रपट तमिळ, हिंदी, आणि तेलुगू या भाषेत बनणारी पहिली त्रिभाषी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्माती मधू म्हणते, “आम्ही आइकॉनिक १९८३ चा विजयावर चित्रपट बनवणार आहे. ‘८३’ नंतर जर भारत  या  वर्षी २०१९ मध्ये वर्ल्ड कप जिंकला तर या विजयावरही एक चित्रपट बनवण्याची इच्छा आहे.”