चुलत बहिणीने अभिनेते जितेंद्र यांच्यावर केला होता बलात्काराचा आरोप ; तब्बल ४७ वर्षांनंतर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ४७ वर्ष जुण्या बलात्कार प्रकरणी बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. जितेंद्र यांच्याविरोधात केलेल्या एफआयआरला हिमाचल हायकोर्टाने रद्द केले आहे.

हा तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार
अभिनेते जितेंद्र यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांच्याच चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप केला होता. याप्रकरणी जितेंद्र यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. जितेंद्र यांनी हायकोर्टात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. याप्रकरणाबाबत तक्रारकर्त्यांनी ४७ वर्षानंतर तक्रार का नोंदवावी ? असा युक्तिवाद जितेंद्र यांच्या वतीने करण्यात आला होता. हा सर्व प्रकार म्हणजे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा दावा जितेंद्र यांच्या वकिलांनी केला होता.

… म्हणून जितेन्द्र यांच्या विरोधातील एफआयआर रद्द
तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत शिमला येथील हॉटेलचा तसेच कोणत्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते याचा उल्लेख केलेला नाही. तसेच दोन सह-कलाकारांची नावेही लिहिलेली नाहीत, याकडेही जितेन्द्र यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर हिमाचल न्यायालयाने महिलेने केलेल्या तक्रारीत विसंगती असल्याचे सांगत, जितेन्द्र यांच्या विरोधातील एफआयआर रद्द केली.

प्रकरण नक्की काय ?
संबंधित महिलेने हिमाचल डीजीपी यांना पत्र लिहून अभिनेते जितेंद्र यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ही घटना १९७१ मधील असल्याचा दावा तक्रारकर्त्या महिलेने केला होता. या तक्रारीत महिलेलेने म्हंटले होते की, मी तेव्हा १८ वर्षांची होते आणि जितेंद्र २८ वर्षांचे. ते आपले दोन सहकलाकार आणि चालकासोबत आले होते. त्यांनी कारमधून मला दिल्लीवरून शिमला येथे नेले. आम्ही शिमल्यात पोहचलो तेव्हा ते थेट मला हॉटेलवर घेऊन गेले. मी बाहेर फिरायला जात असून, लवकर परत येतील, असे सांगून जितेन्द्र बाहेर गेले. मी फार थकलेले होते, त्यामुळे मी झोपून गेले. मध्यरात्री कधीतरी जितेन्द्र दारूच्या नशेत परतले आणि त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. असा आरोप महिलेने केला आहे.

Loading...
You might also like