Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, न्युड व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rape Case Pune | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) 34 वर्षीय युवतीवर वारंवार अत्याचार केले. तसेच शारीरिक संबंधाच्या (Physical Relationship) वेळी काढलेले व्हिडीओ व फोटो व्हायरल (Nude Photos-Videos) करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोथरुड पोलीसांनी (Kothrud Police) 21 वर्षीय तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत कोथरूड व वारजे माळवडी (Warje Malwadi) परिसरात घडला आहे.(Rape Case Pune)

याबाबत 34 वर्षीय युवतीने सोमवारी (दि.15) कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन यश संतोष गांधी Yash Santosh Gandhi (वय-21 रा. पारगाव गावठाण, आंबेगाव) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 377, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पीडित युवती सोबत प्रेमसंबंध होते.

यश गांधी याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ मोबाईल मध्ये काढले. तसेच तरुणीचे न्युड फोटो काढले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्न करण्यास नकार दिला. तसेच व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महिलेचा पाठलाग करुन मुलाला मारण्याची धमकी

वाघोली : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेचा व तिच्या मुलाचा दुचाकीवरुन पाठलाग केला.
वाघोली येथील इस्टेट रोडवरील (Estate Road In Wagholi) पंचरत्न बंगला येथे महिलेची गाडी आडवून मुलाचा खून
करण्याची धमकी (Death Threat) दिल्याप्रकरणी राजेंद्र हरिश्चंद्र रुपनवर Rajendra Harishchandra Roopnavar
(वय-52 रा. एरोली, नवी मुंबई मुळ गाव केडगाव चौफुला ता. दौंड) याच्यावर आयपीसी 354(ड), 504 नुसार गुन्हा
दाखल केला आहे. याबाबत वाघोली येथील 34 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा