वाचून आर्श्चय वाटेल ! पतीविरुद्ध पत्नीने केली पोलिसांत बलात्काराची तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मानववंश वाढविणे व सहजीवनात जीवाभावाचा साथीदार असावा, या हेतूने विवाह करण्यात येतो. त्यातून त्यांच्यात शरीरसंबंध येणे, हे नैसर्गिक असते. मात्र, कोणीही एकमेकांवर जबरदस्ती करता कामा नये, असे कायदा सांगतो.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील २३ वर्षाच्या महिलेने चक्क आपल्या पतीविरुद्ध बलात्कार केल्याची फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी पतीविरुद्ध बलात्कार करणे, मारहाण करणे अशा कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी असून ते मुळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील राहणारे आहे. हा प्रकार हिंजवडी येथील ओयो लॉजवर १८ जूनला रात्री अकरा ते १९ जूनला सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. पतीने आपल्या पत्नीला कंपनीच्या कामाचा बहाणा करुन पुण्यात आणले. त्यानंतर ते रात्री ओयो लॉजवर राहिले. तेथे पतीने पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

तेव्हा तिने त्याला विरोध केला. तिच्या विरोधाला न जुमानता त्याने शिवीगाळ करुन व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली व तिच्याबरोबर शरीरसंबंध केला. दोघांमध्ये इतका वाद झाला की, पत्नीने थेट हिंजवडी पोलीस ठाणे गाठले व आपल्या पतीविरोधातच बलात्काराची फिर्याद दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु 

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स