लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिनेश बाबासाहेब धर्मे (लोणी बु. ता. पाथरी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, दिनेशने पीडित अल्पवयीन मुलीला शेतात नेले. मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने घरी येऊन तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिनेश विरुद्ध तक्रार दाखल केली. दिनेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी पोलीस अधिक तपास करीत आहे.