दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील मुलाकडूनच बलात्कार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – अंजनी बु. येथील एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० जुलै रोजी घडली. ही घटना बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अंजनी येथील दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु. याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध फिर्याद दिली.

या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपी स्वप्नील डोंगरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, १२, POCSO नुसार इतर काही कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गावातून पसार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

You might also like