अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोनदा केला बलात्कार

नागपूरः पोलीसनामा आॅनलाईन

अल्पवयीन मुलीवर 23 वर्षीय युवकाने एकाच दिवशी दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलगी आठवीत शिकत आहे, तर आरोपी नवाज अल मोहम्मद इस्माईल मुजावर हा विवाहीत असून त्याला दोन मुलं देखील आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी तरूण नवाज अली हा मूळचा उत्तरप्रदेशातील रहिवाशी असून, तो एमआडीसी परिसरात कामानिमित्त राहतो. याप्रकरणातील 15 वर्षीय पिडित मुलगी आरोपीची अल्पावधीतच मैत्रीण झाली. शनिवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान वाजता पीडित मुलगी आरोपीच्या रूमवर गेली, तेथे नवाजने बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुपारी 3 वाजता ती घरी परत आली. परत रात्री आठ वाजेच्या सुमासार ती नवाजच्या रूमवर गेली. त्यावेळी देखील नवाजने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमासार मुलगी घरी परतली. आई-वडिलांना संशय आला, परंतु, तिने आपण रस्ता विसरल्याचे सांगितले आणि झोपी गेली. मुलगी आपल्यासोबत खोटे बोलत असल्याचे लक्षात येताच सकाळी वडीलाने दम देत तिची विचारपूस केली, तेव्हा तिने नवाजच्या घरी होते, असे उत्तर दिले. त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली देखील मुलीने यावेळी दिली.

मात्र प्रकरणाला वेगळेच वळणः

पिडीत मुलीने म्हटले आहे आरोपी हा मला खूप आवडतो आणि मीच त्याला प्रपोज केले होते. अशी कबुली अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.