Rashami Desai | रश्मी देसाईच्या हॉट आणि सेक्सी लूकने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) ही तिच्या अभिनयामुळे खूपच चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून रश्मी (Rashami Desai) घराघरात पोहोचली होती. त्यानंतर बिग बॉस 13 मध्ये सहभाग होत तिने अनेकांची मन जिंकली आहेत. रश्मी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकतेच तिच्या Instagram व तिचे नवीन फोटोज शेअर केले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रश्मीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती व्हाइट आणि गोल्डन कलरच्या आऊटफिट मध्ये दिसत आहे. या आऊटफिटमध्ये रश्मी खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. या आऊटफिटला शोभेल असे हेअर स्टाईल करत तिने न्यूड मेकअप करत एकापेक्षा एक पोजेस दिले आहेत. रश्मीच्या या लुकने चाहते घायाळ झाले आहेत. तर अनेकांनी रश्मीच्या या फोटोवर कलाकारांसोबत चाहत्यांनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे.

रश्मी (Rashami Desai) नेहमीच तिच्या फिटनेस आणि फॅशन ने चाहत्यांवर अधिराज्य गाजवत असते. रश्मीने शेअर केलेल्या या फोटोवर आतापर्यंत लाखोंनी लाईक्स आले आहेत. तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजीने कमेंट बॉक्स भरले आहे. रश्मीच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. रश्मीला अनेकदा तिच्या लूकमुळे देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. रश्मीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती सध्या अनेक टीव्ही मालिका आणि रियालिटी शोचा भाग आहे. तर लवकरच ती बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

Web Title :- Rashami Desai | television rashami desai shared new look on instagram see her classy photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो