National Crush Rashmika Mandanna : साऊथ अ‍ॅक्ट्रेस रश्मिकाला Google नं घोषित केलं 2020 ची ‘नॅशनल क्रश’ !

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सिनेमातील सुंदर आणि फेमस अ‍ॅक्ट्रेस रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या चाहत्यांना तेव्हा सर्वांत मोठं सरप्राइझ मिळालं जेव्हा सर्च इंजिन गुगलनं अ‍ॅक्ट्रेसला नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020 फीमेल (National Crush of India 2020 Female) घोषित केलं. गुगल (Google) वर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर रश्मिकाचं नाव दाखवलं जात आहे.

ही माहिती समोर आल्यांतर ट्विटरवरदेखील रश्मिका नॅशनल क्रश हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे. रश्मिकानं या हॅशटॅगचा स्क्रीनशॉट तिच्या ट्विटरवरूनही शेअर केला आहे. सोबतच तिनं लिहिलं की, माझे लोक खरंच लिजेंड्री आहेत. माझं हृदय त्या सर्वांकडे आहे. 24 वर्षीय अभिनेत्री रश्मिका मंदाना ही दक्षिण भारतासोबतच उत्तर भारतातही खूप लोकप्रिय आहे.

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर किरीक पार्टी या सिनेमातून तिनं कन्नड सिनेमात डेब्यू केला होता. या सिनेमातून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. महेश बाबू सोबत तिनं नीकेव्वरू या सिनेमात काम केलं आहे. अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडा याच्यासोबतही तिनं डिअर कॉम्ब्रेड सिनेमात काम केलं आहे. यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. विजय देवरकोंडासोबतचा तिचा गीता गोविंदम हा सिनेमा खूपच गाजला. रश्मिकानं कन्नड, तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. 2018 मध्ये तिनं चलो (Chalo) सिनेमातून तेलगू सिनेमात डेब्यू केला होता. आता ती सुलतान सिनेमातून तमिळ सिनेमात डेब्यू करणार आहे. आतापर्यंत तिचे फक्त 10 सिनेमे रिलीज झाले आहेत. परंतु तिची लोकप्रियता गगनाला भिडली आहे.