Rashmika Mandanna | सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचा किसिंग पोज देताना फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. रश्मिका तिच्या आगामी चित्रपटांमुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये असते. सोशल मीडियावर देखील रश्मिका अनेक नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 38.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सध्या सोशल मीडिया रश्मिका मंदाना ही चर्चेत आली आहे. तिचा एक किसिंग फोटो (Rashmika Mandanna Kissing Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना ही बॉलीवुड (Rashmika Mandanna In Bollywood) देखील गाजवत आहे. रश्मिकाचा मोठा चाहता वर्ग असून तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावाजले जाते. सोशल मीडियावर ती आपल्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नो मेकअप लूक मध्ये अतिशय सिंपल लूक मध्ये झळकत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती किसिंग पोज (Rashmika Mandanna Giving Kissing Pose) देताना दिसत आहे. सध्या रश्मिकाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. तिच्या या फोटोखाली कमेंटचा पाऊस पडत असून अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबत नाव जोडले जाते. ही ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन जोडी ही जबरदस्त लोकप्रिय आहे. अनेकदा ते एकमेंकासोबत फिरताना दिसतात मात्र अद्याप त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. रश्मिकाच्या वर्क फ्रन्ड बद्दल बोलायचे झाल्यास तिचे अनेक बहुचर्चित चित्रपट (Rashmika Mandanna Upcoming Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती लवकरच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘ॲनिमल’ या चित्रपटामध्ये (Animal Movie) झळकणार आहे. तसेच सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना ही पुष्पा 2: द रूल (Pushpa 2: The Rule) या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे