Rashtrawadi Congress Party (NCP) | राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुण नेतृत्वाला संधी - माजी आमदार जगन्नाथ शेवाळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rashtrawadi Congress Party (NCP) | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापनदिन (Anniversary) उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस भवन (Rashtrawadi Congress Party (NCP) येथे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (Former MLA Jagannath Shewale) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. यावेळी बोलताना शेवाळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच तरुण नेतृत्वाला वाव देण्याचे काम पवार साहेबांनी वेळोवेळी केलेले आहे. पक्षाच्या मंत्रिपदापासून ते सर्वच पदांवर जास्त तरुण नेतृत्वाला (Young Leadership) संधी देण्याचा प्रयत्न पक्षाने सातत्याने केला आहे. पक्षसंघटन बळकट करून प्रत्येकाने पक्ष सर्वच ठिकाणी कायमच अग्रस्थानी कसा राहील याकरिता प्रयत्नशील राहीले पाहीजे, असे आवाहन शेवाळे यांनी केले.

 

 

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap), खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), जयदेव गायकवाड (Jaydev Gaikwad), भगवानराव साळुंखे (Bhagwanrao Salunkhe), अंकुश काकडे (Ankush Kakade), दीपाली धुमा़ळ (Deepali Dhumal), प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), रवींद्र माळवदकर (Ravindra Malwadkar), योगेश जगताप (Yogesh Jagtap) तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Rashtrawadi Congress Party (NCP) हा महात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे.  सध्या राजकीय परिस्थितीमुळे वातावरण अत्यंत गढूळ होत आहे. पक्षाचा तेवीस वर्षांचा नेत्रदीपक प्रवास त्याचबरोबर महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर पक्षाची वाढ आज मोठ्या प्रमाणात झाली आहे.  23 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शहरातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष तथा पदाधिकारी विविघ वर्तमानपत्रातील पत्रकार मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पक्षांचे पदाधिकारी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हजारोंच्या संख्येने सायंकाळी झालेल्या स्नेह मेळाव्यात उपस्थित होते.

 

मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
‘मरणोत्तर नेत्रदान (Eye Donation) संकल्प’ कार्यक्रम ह्या पक्षाच्या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे,
प्रदीप देशमुख यांनी स्वतःचे मरणोत्तर नेत्रदानाचे फॅार्म भरुन या उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी उपस्थित 507 जणांनी फॅार्म भरुन मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाचे आयोजन पुणे शहर उपाध्यक्षा डॉ.सुनिता मोरे (Pune City Vice President Dr. Sunita More
यांनी केले होते तसेच पक्षाच्या वतीने अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीची (Akhil Mandai Mandal Sharda Ganpati) महाआरती करण्यात आली.
प्रार्थना समाज, बुधवार पेठ येथे वृक्षारोपण तसेच पुणे शहराच्या विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

Web Title :- Rashtrawadi Congress Party (NCP) | NCP celebrates 23rd anniversary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Credit Card Linking | RBI च्या मंजूरीनंतर ‘या’ बँकांच्या क्रेडिट कार्डने होईल यूपीआय पेमेंट, असे करा लिंक

 

Pune PMC School News | महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त विलास कानडे

 

MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | ‘नुपूर शर्माला फाशी द्या’ – खा. इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारकडे मागणी