RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! सुर्या ग्रुप, मिलेनियम इंजिनिअर्स, सुरोज बिल्डकॉन, आरकॉन संघांची विजयी कामगिरी

पुणे : RASS Trophy Cricket Tournament | रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. (rass project consultants pvt. ltd) तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत सुर्या ग्रुप, मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स, सुरोज बिल्डकॉन आणि आरकॉन पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (RASS Trophy Cricket Tournament)

स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनावळे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आकाश नवले याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सुर्या ग्रुप संघाने एसजे कॉन्ट्रॅक्टर्सचा ४९ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सुर्या ग्रुपने १२४ धावांचे आव्हान उभे केले. आकाश नवले याने ५० धावांची तर, सुधीर कडूसकर २६ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना एसजे कॉन्ट्रॅक्टर्सचा डाव ७५ धावांवर मर्यादित राहीला. सुर्या संघाच्या राजेश पवार (३-२४), आकाश नवले (२-१२) आणि शुभम महाले (२-८) यांनी अचूक गोलंदाजी केली. (RASS Trophy Cricket Tournament)

सुर्यकांत परीदा याच्या खेळीच्या जोरावर मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स संघाने एसकॉन प्रोजेक्टस् संघाचा ४ गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला. ओंकार कोठाळकर याच्या नाबाद ८० धावांच्या खेळीमुळे आरकॉन पुणे संघाने रोहन बिल्डर्स संघाचा ३२ धावांनी पराभव करून स्पर्धेत गुणांचे खाते उघडले.

योगेश लंके याच्या ७७ धावांच्या जोरावर सुरोज बिल्डकॉन संघाने न्याती इंजिनिअर्स संघाचा ५३ धावांनी पराभव करून पहिल्या विजयासह स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना योगेश लंके याच्या ७७ धावांच्या खेळीमुळे सुरोज संघाने १४४ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्याती इंजिनिअर्स संघाचा डाव ९१ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सुर्या ग्रुपः १० षटकात ७ गडी बाद १२४ धावा (आकाश नवले ५० (२६, ५ चौकार, ३ षटकार), सुधीर कडूसकर २६,
करण जाधव २-२०, अक्षय झगडे २-१८) वि.वि. एसजे कॉन्ट्रॅक्टर्सः ८.३ षटकात १० गडी बाद ७५ धावा
(सिद्धेश वारूळे २३, अमर थोरात १५, राजेश पवार ३-२४, आकाश नवले २-१२, शुभम महाले २-८); सामनावीरः
आकाश नवले;

एसकॉन प्रोजेक्टस्ः १० षटकात ४ गडी बाद ७५ धावा (निलेश बनकर ३०, इंद्रजीत बोडके २५, प्रभात देवदी १-५) पराभूत वि. मिलेनियम इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सः ८.३ षटकात ६ गडी बाद ७९ धावा (सुर्यकांत परीदा ३७, निखील यादव नाबाद १०, आशिष साळुंखे १-३); सामनावीरः सुर्यकांत परीदा;

आरकॉन पुणेः १० षटकात १० गडी बाद १३० धावा (ओंकार कोठाळकर नाबाद ८० (२३, ६ चौकार, ८ षटकार),
रविंद्र तलवार १४, नचिकेत सी. २-८) वि.वि. रोहन बिल्डर्सः ९.४ षटकात १० गडी बाद ९८ धावा
(निखील येनपुरे ४६ (१९, ५ चौकार, ३ षटकार), यशवंत जोशी २४, रविंद्र तलवार ४-१५, ओंकार कोठाळकर ३-१६);
सामनावीरः ओंकार कोठाळकर;

सुरोज बिल्डकॉनः १० षटकात ४ गडी बाद १४४ धावा (योगेश लंके ७७ (२७, ५ चौकार, ८ षटकार), प्रियांश तिवारी २४,
रजनिकांत पडवळ २१, सचिन तांबे २-२८) वि.वि. न्याती इंजिनिअर्सः १० षटकात ६ गडी बाद ९१ धावा
(तरबेज शेख २५, दिनेश मिसाळ १४, विकास मते २-९, रजनिकांत पडवळ २-२२); सामनावीरः योगेश लंके.

Web Title :- RASS Trophy Cricket Tournament | Winning performance of Surya Group, Millennium Engineers, Suroj Buildcon, Rcon teams

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात

Nandurbar ACB Trap | वाळूचा ट्रक सोडण्यासाठी 70 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Hingoli Crime News | वडील रागावल्याने अल्‍पवयीन मुलाकडून जन्मादात्या बापाची हत्या