…अन् रतन टाटांनी सांगितला मजेदार किस्सा, कुत्र्याचं का नाव ठेवलं ‘गोवा’ ?
पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता टाटांनी अशीच एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी एक गंमतीदार किस्सा सांगितला आहे.
रतन टाटा यांचे प्राण्यांवर फार प्रेम आहे. खासकरून त्यांचे कुत्र्यावर जास्त प्रेम आहे. टाटा ग्रुपचे ग्लोबल हेडक्वार्टर म्हणजेच बॉम्बे हाउसचा काही भाग रतन टाटा यांनी रस्त्यावरील कुत्र्यांसाठी तयार केला आहे.या कुत्र्यांमधील सगळयात लोकप्रिय असा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा ज्याचे नाव गोवा आहे. असे म्हटले जाते की, गोवा रतन टाटांचा सगळ्यात आवडता कुत्रा आहे. रतन टाटा या कुत्र्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. टाटांनी याआधीही दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये टाटा गोवासह इतर कुत्र्यांबरोबर दिसले होते. यांनी या पोस्टमध्ये आपल्या कुत्र्याचे नाव गोवा का ठेवले याचा खुलासा केला आहे.
82 वर्षांच्या रतन टाटांना कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने विचारले की या कुत्र्याचे नाव गोवा असे कशावरून ठेवले. तेव्हा टाटांनी सांगितले की, जेव्हा हे कुत्र्याचे पिल्लू लहान होते तेव्हा इकडे तिकडे फिरत होते. त्यानंतर ते माझ्या सहकाऱ्याच्या गाडीत येऊन बसले आणि त्यानंतर बॉम्बे हाऊसपर्यंत येऊन थांबले. हा कुत्रा गोव्यावरून आमच्या सोबत आला होता. म्हणून त्याचे नाव गोवा ठेवण्यात आले आहे. जवळपास एका वर्षापूर्वी रतन टाटांनी आपले इस्टाग्राम अकाऊंट तयार केले आहे. या अकाऊंटवर टाटा आपले जुने फोटो आणि आठवणी शेअर करतात. आतापर्यंत या अकाऊंटवर 3 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.