‘डे’ साजरे करण्यापेक्षा सत्‌कर्म करा…..प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन 

‘पाणी पिओ छान के, मित्र बनाओ जान के।’ आपण ज्याप्रमाणे अशुध्द पाणी शुध्द करुन गाळून पितो, त्याचप्रमाणे मित्र सुध्दा शुध्द आचार विचारांचे असावेत. आजच्या तरुण पिढीने फ्रेन्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यापेक्षा सर्वांनी चौविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाचे अनुकरण करुन सत्‌कर्माचा मार्ग पत्कारावा. संपत्तीचा अहंकार, दर्प असणारी व्यक्ती सत्‌कर्म करु शकत नाही. कष्टाशिवाय मिळालेले धन, संपत्ती हे पिडा, यातना, दु:ख घेऊन येते. आई वडीलांकडून, वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा अहंकार बाळगू नये. जैन धर्मातील सर्व संत महात्म्यांनी वैभव नाकारुन वैराग्य स्विकारले आहे. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

[amazon_link asins=’B01I57XLNW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eadbc7c4-9952-11e8-9a0c-db65f1b7f991′]

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले आहे. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, आत्म्याला साधना व तपाची जोड दिल्यास त्याच्यात परमात्मा होण्याची शक्ती येते. वर्तमानात साधनेने व तपाने निर्विकार अवस्था प्राप्त झाल्यास प्रत्येक नर नारायण बनू शकतो. एवढी उच्च शक्ती साधनेत आहे. स्वैराचाराकडे वळू पाहणा-या आजच्या तरुण पिढीने शक्य तेवढा वेळ तप, साधना करावी; तसेच फ्रेन्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यापेक्षा सर्वांनी तिर्थंकर भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाचे अनुकरण करून आई, वडील व संतांची सेवा करावी. असे प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या.
खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/