Ration Card | खुशखबर ! रेशन कार्डधारकांना नोव्हेंबरपर्यंत फ्री ‘रेशन’शिवाय मिळतील अनेक मोठे फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेशन कार्ड (Ration Card) असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने गरीबांना पुढील 4 महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत फ्री रेशन देण्याची घोषणा केली होती. या योजनेद्वारे देशातील सुमारे 80 कोटी लोकांना फ्री रेशनची (Ration Card) सुविधा दिली जाईल. या अंतर्गत गरीबांना 5 किलो धन्य रेशन मोफत (Free 5Kg) दिले जात आहे.

रेशन कार्डचे फायदे

– रेशन कार्डद्वारे फ्री आणि स्वस्त रेशनशिवाय आणखी देखील सुविधा मिळतात.

हे कार्ड तुम्ही अ‍ॅड्रेस एड्रेस प्रूफप्रमाणे वापरू शकता.

तसेच ओळखपत्र म्हणून वापरता येते.

बँक, गॅस कनेक्शन इत्यादी सर्व कामांसाठी याचा वापर होतो.

वोटर आयडी कार्ड बनवण्यासह इतर महत्वाचे डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

कोण करू शकते अप्लाय
तुमचे इन्कम 27 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही गरीबी रेषेखालील रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता. सरकारकडून इलिजिबिलिटीनुसार गरीबी रेषेच्यावर (APL), गरीबी रेषेच्या खाली (BPL) कार्ड आणि अंत्योदय रेशन कार्ड (AAY) बनवू शकता.

असे करा अप्लाय

जर तुम्ही उत्तर प्रदेशचे राहणारे असाल तर https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वर अ‍ॅक्सेस करून फॉर्म डाऊनलोड करू शकता.

यानंतर त्यामध्ये सर्व माहिती भरून आपल्या भागातील रेशन डीलर किंवा अन्न पुरवठा विभागात द्या.

अर्जासाठी तहसीलमध्ये यासंबंधीच्या अधिकार्‍यांशी सुद्धा संपर्क साधू शकता.

तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता.

रेशन कार्डचा फॉर्म सोपवल्यानंतर स्लिप घेण्यास विसरू नका.

रेशन कार्डसाठी अर्ज शुल्क 5 ते 45 रुपयांपर्यंत आहे.

Web Title :- ration card holders will get many banefits on this card know about it here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | ‘तुला माझ्याबरोबर एक रात्र यावे लागेल’ ! भोसरी पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेकडे शरीर सुखाची मागणी

NCPCR Study | 10 वर्षाची 37.8 % मुले Facebook वर ‘अ‍ॅक्टीव्ह’, 24.3 % मुलांचे Instagram वर अकाऊंट

Pimpri Crime | सफाई कामगारांचे पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपनीच्या संचालकासह 15 जणांवर FIR, 7 जणांना अटक