Ration Card Update | रेशन कार्डात करायचा असेल पत्नीच्या नावाचा समावेश तर काय करावे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : Ration Card Update | जेव्हा घरात विवाहानंतर एखादा नवीन सदस्य येतो, किंवा घरात मुल जन्माला येते, तेव्हा त्याच्या नावाचा रेशन कार्डमध्ये समावेश करावा लागतो. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याच्या नावाचा समावेश ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही प्रकारे करू शकता. यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेवूयात. (Ration Card Update)

 

या कागदपत्रांची असते आवश्यकता

कुटुंबातील नवीन मुलाचे रेशन कार्डमध्ये नाव टाकायचे असेल तर कुटुंब प्रमुखाकडे रेशन कार्ड असावे. कुटुंब प्रमुखाला मुळ रेशनकार्डसह एक फोटो कॉपी आणावी लागेल. मुलाचा जन्म दाखला आणि त्याच्या आई-वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डमध्ये (Ration Card) टाकण्यासाठी तिचे आधार कार्ड (Aadhaar Card), विवाह प्रमाणपत्र (marriage certificate) आणि तिच्या आई-वडिलांचे रेशनकार्ड अनिवार्य आहे. (Ration Card Update)

 

रेशन कार्डमध्ये ऑनलाइन करा नावाचा समावेश

– रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा

– जर तुम्ही उत्तर प्रदेशचे असाल तर (https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx) या लिंकवर जा.

– यानंतर अ‍ॅपलाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड च्या लिंकवर क्लिक करा.

– रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते..

– अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा

– अ‍ॅपलिकेशन बसमिट करा.

– फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

– रेशनकार्ड पोस्टाने तुमच्या घरी पाठवले जाईल.

 

Web Title :- Ration Card Update | ration card update if you want to add your wife name in ration card what will you have to do

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा