Raveena Tandon | रवीना टंडनचे मोठे वक्तव्य ! “माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुपरस्टार पण आमिर- सलमान…”

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘केजीएफ 2’ (KGF 2) मधील आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) नेहमी चर्चेत असते. नुकतीच रवीना एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानच्या (Aamir Khan) नावाचाही उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. प्रसारमाध्यमाकडून पुरुष आणि महिला कलाकारांची ओळख सांगताना केल्या जाणाऱ्या भेदभावाकडे लक्ष करत तिने (Raveena Tandon) हे वक्तव्य केले होते.

 

रविना टंडनने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा आमिर खान दोन-तीन वर्षांनी ब्रेक घेऊन पुन्हा चित्रपटात काम करतो तेव्हा त्याला पुनरागमन किंवा 90 च्या दशकातील सुपरस्टार आमिर खान असे का बोलले जात नाही. तेच मात्र विविध आर्टिकल्समध्ये 90 च्या दशकातील सुपरस्टार माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता हे करतीये किंवा ते करते असे का लिहिले जाते. माधुरी दीक्षितने बॉलीवूड (Bollywood) मध्ये बराच काळ काम केले आहे आणि सध्या ती अजूनही काम करत आहे. मग तिला 90 च्या दशकातील सुपरस्टार असे लेबल लावण्यात काय अर्थ आहे. तसेच तिला इतर पुरुष कलाकारांप्रमाणे वागणूक का दिली जात नाही. माझ्या मते आता पुरुष आणि महिला कलाकारांमध्ये असमानता संपायला हवी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे माधुरी दीक्षितला संबोधता त्याप्रमाणे सलमान खान, संजय दत्त (Sanjay Dutt) किंवा आमिर खान यांच्या बद्दल का बोलत नाही केवळ आणि केवळ महिला कलाकारांबद्दल असे बोलणे आता थांबायला हवे” असेही रवीना ने यावेळी सांगितले.

 

रविना टंडनच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ‘घुडचडी’ (Ghudchadi) चित्रपटात रवीना दिसणार आहे. तर तिच्यासोबत या चित्रपटात संजय दत्त, पार्थ समथान (Parth Samthaan) आणि खुशाली कुमार (Khushali Kumar) ही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट फॅमिली ड्रामा ने भरलेला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिनॉय गांधीने (Binoy Gandhi ) केले आहे. तर निर्मिती टी सिरीज आणि किप ड्रिमिंग पिक्चर्सची आहे. याचबरोबर अरबाज खानच्या (Arbaaz khan) आगामी सोशल ड्रामा ‘पटना शुल्का’ मध्येही रवीना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

 

Web Title :- Raveena Tandon | raveena tandon open up about difference between
the presentation of male and female actors in the media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा