Ravi Rana | माझ्या विरोधात 50 लोक उभे राहिले, तरी मी निवडून येईन – रवी राणा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या सुरु असलेल्या भांडणावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी करत, दोघांची समजूत काढली आणि या वादावर पडदा पाडला आहे. त्यानंतर प्रथमच रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशानुसार मी बच्चू कडू यांची माफी मागितली आहे. त्यामुळे आमच्या वादावर आता पडदा पडला आहे. दोन दोन पावले आम्ही दोघे मागे आले आहोत. लोकशाहीत अशी भांडणे होत राहतात. महाराष्ट्रात इतरही मोठे मुद्दे आहेत. विकासाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री लाभल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहून विकासकामांवर आता लक्ष घालणार आहोत, असे राणा म्हणाले.

बच्चू कडू रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतदार संघात आगामी विधानसभेला त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार, अशी चर्चा आहे. त्यावर देखील रवी राणा यांनी भा।ष्य केले. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्या विरोधात कितीही लोक उभे राहिले, तरी जनता माझ्या पाठिशी आहे. जनता ज्यांच्यासोबत असते, त्यांना कशाची भिती नाही. मी लढेन आणि जिंकून येईन, असे राणा यांनी सांगितले.
मी विद्यार्थी, शेतकरी, विधवा महिला आणि माजी सैनिकांना मदत करत आलो आहे.
मी माझा पगार देखील लोकांना देत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशी मदत केली पाहिजे, असे राणा यावेळी म्हणाले.

रवी राणा आणि बच्चू कडू वाद मागील काही दिवस चिघळला होता. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला
जाऊन 50 कोटी घेतल्याचे आरोप केले होते. तसेच कडू तोडपाणी करतात, ते पैसे घेऊन लोकांना पाठिंबा देतात,
असे देखील राणा म्हणाले होते.

Web Title :-  Ravi Rana | Even if 50 people stand against me, I will be elected – Ravi Rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | स्वराज्य पक्षांच्या 105 पेक्षा जास्त शाखांचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’