मास्टर-ब्लास्टरच्या मुलाला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी

पोलीसनामा ऑनलाईन

भारताचे माजी खेळाडू तसेच भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे रवी शास्त्री आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला वेळ काढून काही मोलाचे सल्ले देत आहेत.

एक गोष्ट कळाल्यानंतर तुम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसेल आणि कदाचित या गोष्टीवर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. भारताच्या संपूर्ण संघाला प्रशिक्षण देणारे भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला

वेळात वेळ काढून क्रिकेटचे काही मोलाचे सल्ले देत आहेत.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db7cf21b-7a93-11e8-ac9c-01110d795e42′]
अगदी वेळात वेळ काढून ते सध्या अर्जुनला क्रिकेटचे नवे डावपेच शिकवत आहेत. या गोष्टीवर तुमचा अजूनही विश्वास बसला नसेल. तर मग एक काम करा बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवर जाऊन बीसीसीआयने शास्त्रींनीं अर्जुनला मोलाचे सल्ले देत असल्याचे ट्विट करत सोबत फोटोही दिला आहे.

भारतीय संघ लंडनला दाखल झाला आहे. लंडनहून भारतीय संघ आयर्लंडला ट्वेन्टी-20 सामने खेळायला जाणार आहे. यादरम्यान शास्त्री यांना थोडा वेळ मिळाला आणि त्यांनी अर्जुनला काही मौलिक सल्ले दिले. अर्जुन सध्या भारतीय ‘ अ ‘ संघात आहे.