Ravikant Tupkar on CM Eknath Shinde Shivsena | …तर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, महाराष्ट्र माज खपवून घेत नाही, शिंदे गटाचा धुआँ निघणार, या नेत्याने फटकारले

मुंबई : Ravikant Tupkar on CM Eknath Shinde Shivsena | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे. यावरूनच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादागिरीने काही होत असते तर अरुण गवळी (Arun Gawli) मुख्यमंत्री झाले असते, महाराष्ट्र माज खपवून घेत नाही, शिंदे गटाचा धूर निघणार, असे तुपकर यांनी म्हटले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले की, शिंदे गटाचा महाराष्ट्रात धुआँ निघणार आहे. महाराष्ट्र माज खपवून घेत नाही. सत्तेचा माज शिंदे गटाला आहे. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्याच पक्षात धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले वरच्या नेत्यांनी युती केली. जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत.

एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले, उदय सामंत सारखे मंत्री फक्त पैसे वाटायला होते. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदेंनी केला. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असे तुपकर म्हणाले.

रविकांत तुपकर यांनी म्हटले की, महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. राज्याचा दौरा करणार आहे. गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो. कुठल्याही माणसाने ज्योतिष वर्तणे बरोबर नाही. सगळेच दावे करतात आम्ही येणार मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल. (Ravikant Tupkar on CM Eknath Shinde Shivsena)

तुपकर यांनी म्हटले की, नवीन पक्ष काढण्याचा माझ्या डोक्यात विचार नाही.
पण प्रस्थापितांच्या चळवळीची स्पेस तरुणांना खुणावत आहे.
तरुण एकत्र येऊन नवीन पर्याय देणार आहेत.
पक्ष म्हणून असे नाही पण सगळ्यांची मोट बांधू.
राजकारणात सामान्यांच्या पोरांनी का येऊ नये.
चांगल्या विचाराचे लोक राजकारणात आले पाहिजेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…