Ravindra Dhangekar | भाजपच्या कारकिर्दीत पुण्याच्या विकासाला ब्रेक – रवींद्र धंगेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | पुण्यात गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला खीळ बसली आहे. १०० नगरसेवक शहरातील सहाही आमदार आणि १ खासदार याबरोबरच केंद्रात व राज्यात सत्ता एवढे असूनही पुण्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी केंद्र व राज्य सरकारकडून भाजपने का नाही मिळवला असा प्रश्न महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे (Congress Candidate) उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. कसबा मतदार संघातील (Kasba Vidhan Sabha) पदयात्रेच्या सांगता वेळी ते बोलत होते. पदयात्रेस कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती. (Pune Lok Sabha)

धंगेकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सन १९९२ ते २०१७ या कालावधीत मित्र पक्षांच्या मदतीने पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण केला. ( पुणे पॅटर्नचा कालावधी सोडून). जवाहरलाल नेहरू योजनेतून पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून २५०० कोटी रुपयांचा विकासनिधी पुण्यासाठी आणला. त्यामुळे पुण्याच्या विकासात चांगली भर पडली. त्यानंतर मात्र भाजप सत्त्तेवर आल्यावर गेल्या ७ वर्षात पुण्याला कोणी वाली नाही असे चित्र उभे राहिले. याचे कारण म्हणजे पुण्याच्या विकासाबाबत भाजप निष्क्रिय राहिला. त्यामुळेच वाहतूक कोंडी, अपुरा पाणी पुरवठा, पर्यावरणाचे प्रश्न, बेकारी अशा अनेक प्रश्नांमुळे पुणेकर त्रस्त झाले. त्यासाठीच आता पर्वर्तन आवश्यक असून १३ मे या दिवशी महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाच्या चिन्हापुढील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे धंगेकर यावेळी पुढे म्हणाले. (Ravindra Dhangekar)

धंगेकरांच्या पूर्व भागातील पदयात्रेत JCB तून फुलांचा वर्षाव

कसबा विधानसभा मतदार संघाची पदयात्रा महात्मा फुले स्मारकापासून सुरु झाली. आत्तापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जीप यात्रा आयोजित केल्या जायच्या या लोकसभा निवडणुकीत उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी मात्र सर्वत्र पायी चालत पदायात्रेतून नागरिकांशी संवाद साधला ही विशेष बाब मानवी लागेल. ही पदयात्रा शहराच्या पूर्व भागात झगडे आळी, घोरपडे पेठ पोलीस चौकी, घसेटी पुल, कस्तुरे चौक, मोमीनपुरा, काची आळी, सुभानशा दर्गा, शितळा देवी चौक, गाडीखाना, पानघंटी चौक, राष्ट्रभुषण चौक मार्गे खडकमाळ आळी येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल – ताशा सर्व पक्षांचे झेंडे, फटाक्यांचा धुमधडाका आणि जयघोषाच्या घोषणा अशा वातावरणात उमेदवार रवींद्र धंगेकर मार्गावरील शेकडो नागरिकांना भेटत होते. अनेक सार्वजनिक गणेश मंडळात त्यांनी श्री गणेशाची आरती केली, काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा पदायत्रेत ठिकठिकाणी उंचावला जात होता विशेष म्हणजे घोरपडे पेठ पोलीस चौकी येथे हेमंत राजभोज आणि शाबीर खान यांनी जे सी पी मधून रवींद्र धंगेकरांवर फुलांचा वर्षाव केला. त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाटामुळे वातावरण भरून गेले होते. मार्गावरील अनेक मंदिरे व प्रार्थना स्थळांना धंगेकरांनी भेट देऊन दर्शन घेतले. राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक असणाऱ्या शहराच्या पूर्व भागात धंगेकरांना मोठा परतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

या पदयात्रेत उमेदवार आमदार धंगेकरांसोबत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी महापौर कमाल व्यवहारे, काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, नेहरू स्टेडीयम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, शाबीर खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गणेश नलावडे, संदीप गायकवाड, सुमित डांगे, निलेश बोरवडे, गणेश भंडारी, सागर कांबळे, शैलेश आंदेकर, रुपेश पवार, आयुब पठाण, रवी पाटोळे, सईद सय्यद, सौरव आमराळे, विक्रम खन्ना आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडकीतही मोठा प्रतिसाद

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील खडकी व खडकी बाजार परिसरात रवींद्र धंगेकरांच्या पदयात्रेस खूप मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे, हाताच्या पंज्याच्या प्रतिकृती, ढोल ताशा आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात दिलेल्या घोषणा यामुळे खडकीचा सारा परिसर दुमदुमून गेला होता. चौका चौकात फटाक्यांच्या माळा लागत होत्या. खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद आणि पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद यांनी आयोजित केलेल्या पदयात्रेत ७००-८०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेच्या दिवशीच पूजा आनंद यांचा वाढदिवस असल्याने खडकी व खडकी बाजार परिसरात चौकाचौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावल्या व ठिकठिकाणी केक कापले गेले यावेळी महाविकास आघाडीच्या जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. खडकी कचेरीचे उद्घाटनही यावेळी केले गेले. या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बरोबर सेल्फी काढले. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


या पदयात्रेत खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आंनद, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ज्ञानेश्वर उर्फ माउली यादव, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष उदयभाऊ महाले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवाजीनगर कार्याध्यक्ष राजू साने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहर संघटक प्रशांत राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खडकी विभाग प्रमुख हेमंत यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपविभाग प्रमुख प्रकाश चौरे, काँग्रेस खडकी ब्लॉक अध्यक्ष भगतसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष खडकी विभाग अध्यक्ष निकित यादव, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, बंडू चव्हाण, प्रशांत गवळी, मनोज सूर्यवंशी, गिरीश सोनार, अजित जाधव, सुंदरताई ओव्हाळ, अक्षय शिंदे, रणजीत गायकवाड, संजय खडसे, शिवराज गुले, प्रियंका मधाळे, अशरफ तांबोळी, रोहिनी बोरसे आदी सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार