Ravindra Dhangekar | पुण्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी धंगेकरांनी पुढाकार घ्यावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar | आता पुण्यातील नदी अत्यंत भीषण स्थितीत आहे मुळात गरजेच काय आहे? नदी सुधारण गरजेच आहेच पण सगळ्यात आधी पुण्यातील नदी शुद्ध करणं गरजेच आहे, तिच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करणं गरजेच आहे तर ते सोडून आपण सौदर्यीकरणाकडे चाललो आहोत म्हणजे आठवडाभर अंघोळ केली नाहीये पण ब्युटी पार्लर मध्ये जाण्यासारखं आहे. असे मत नदी सुधार चळवळ संदर्भातील जेष्ठ कार्यकर्ते सारंग यादवाडकर (Sarang Yadwadkar) यांनी आज व्यक्त केले.

पुण्यातील पर्यावरणवादी संस्थांच्या वतीने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेसचे (Congress) उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे भेटून निवेदन देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख आणि माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Congress), सारंग यादवाडकर, प्राजक्ता दिवेकर, स्वप्नील दुधाणे ( अर्बन सेल), भाऊसाहेब आसबे, संग्राम खोपडे आदि उपस्थित होते.(Ravindra Dhangekar)

सारंग यादवाडकर पुढे म्हणाले की, जे काही ५ – १० कोटी आपण नदी सुधार प्रकल्पावर खर्च केलेत ते जर आपण नदीच्या शुद्धतेसाठी किंवा स्वछतेसाठी खर्च केले तर त्याचा नदीला जास्त उपयोग होईल. नदी पात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे भारतातील सर्व नियम, सर्व कायदे, सर्व मानक डावलून हे सर्व सुरु आहे आणि ही केवळ मनमानी आहे. नदीपात्र ४०% नी आकुंचित होणार आहे अस त्यांचच रेकॉर्ड सांगतय. नदी पात्र अरुंद झाल तर पूर पातळ्या वाढतील. नदी सुधार म्हणजे पुराची गॅरंटी अस सांगून यादवाडकर पुढे म्हणाले की ते आपण थांबवायचं की चालू द्यायचं हे आता आपल्या हातात आहे.

सगळ्यात पहिल्यांदा आपण हे थांबवल पाहिजे कारण मुळात या कामाला पर्यावरणीय मंजुरी देखील नाहीये आणि पर्यावरणीय मंजुरी नसताना ही कामे राबवण म्हणजे केवळ हुकुमशाही आहे. हे काम थांबावणं, नदी पत्रातील राडारोडा काढणं, लोकसंख्येचा विचार करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करणं, घनकचरा व्यवस्थापन उत्तम करणं, नदीची स्वछता करणं हे आपण आता करणं गरजेच आहे. नदी ही मुळातच खूप सुंदर असते आपण तिला विद्रूप बनवले आहे आता तिला परत सुंदर करण्याच्या नावाखाली आपण हजार कोटी खर्च करतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे असे यादवाडकर म्हणाले.

या वेळी उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी सामान्य माणूस आहे माझं काम बोलत, भाजपाने गेली १० वर्ष जे काम केलंय त्यात त्यांनी सामान्य माणसाला लुटले आहे महागाई वाढली आहे.तुम्ही काँग्रेसला निवडून दिलेत तरच मी तुमची मदत करीन असे नाही सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा सामान्य माणूस नेहमी तत्पर असेल. पुण्याच्या सामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मी याआधीही विधानसभेत मांडले आहेत पण आता मला ते लोकसभेत देखील मांडायचे आहेत त्यासाठी मी तत्पर आहे मी हे आवाहन स्वीकारले आहे.

माननीय खासदार सुरेश कलमाडी यांच्या काळात त्यांनी पुणे शहराच्या विकासाची एक सकारात्मक मोट बांधलेली आहे त्याची प्रेरणा घेऊन मी देखील तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा आणि जमेल तितके नाही तर सर्वच प्रश्न साध्या सरळ आणि सोप्या सच्च्या मार्गाने सोडविण्याचे आश्वासन सर्व सुजाण पुणेकर नागिरकांना देऊ इच्छितो..कलमाडी सरांच्या आणि माझ्या कामाची पुण्यात नक्की तुलना होणार तोच आदर्श समोर ठेऊन तुमचा जहिरनामा व निवेदन आपण द्यावे. मी नक्की आपल्यासोबत आहे काँग्रेस आपल्या सोबत भविष्यातील वाटचलीत कायमच बरोबर आहे आणि राहील याची ग्वाही मी तुम्हा सर्वांना देतो. असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

याप्रसंगी पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ज्या ज्या चळवळी झाल्या त्या प्रत्येक चळवळीमध्ये मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की पुण्याचे पर्यावरण हे चांगले राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात क्लायमेट चेंज अथॉरिटीचि स्थापना करू असे आश्वासन दिले आहे असे सांगून मोहन जोशी पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षातली जर आपण पुण्याची परिस्थिती पाहिली तर ती अतिशय बिकट आहे. पुणे शहराच्या पर्यावरणाचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न असे कोणतेही प्रश्न भाजपला सोडवता आलेला नाही.

हवेच्या प्रदूषणात दिल्लीनंतर आपल्या पुण्याचा नंबर येतो. आम्हाला आता नवीन पिढीच्या भविष्याचा विचार करायचा आहे, आणि तो आत्ता रवींद्र धंगेकर करतील काँग्रेस पक्ष करेल हे मी तुम्हाला इथे आवर्जून सांगू इच्छितो. विधी मंडळात मी काम करत असताना ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नंवर देखील आम्ही अनेक वेळा चर्चा केली आहे. वाहतूक कोंडी कशा प्रमाणात नियंत्रित करता येईल याची दृष्टी आमच्यकडे आहे. भाजप यातले काहीच गेल्या १० वर्षात करू शकलेला नाही. आज वर पुणेकरांना वेठीला धरण्याचे काम भाजपने केले आहे, रवींद्र धंगेकर यांचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे म्हणून आपल्या पुण्याला वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर निवडून आले पाहिजेत यांना आपण निश्चितच निवडून आणू असा मला विश्वास आहे. असे मोहन जोशी म्हणाले.

वेताळ टेकडी बचाव कृती समिती तर्फे पर्यावरणाला हानिकारक जे प्रोजेक्ट्स पुणे महानगरपालिका, स्टेट गव्हरमेंट यांनी होऊ घातले आहेत, जे पुण्याच्या डेव्ह्लपमेंट मध्ये टाकले आहेत ते म्हणजे बाल भारती, पौड फाटा रस्ता आणि वेताळ टेकडी कोरून दोन बोगदे कोथरूड ते पाषाण पंचवटी आणि गोखले नगर ते पाषाण पंचवटी यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होणार आहे. तर या गोष्टीला आम्ही बरेच वर्ष विरोध करत आहोत. मागील वर्षी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंदना चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी आम्हाला पाठींबा दिला होता.

आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो, ज्यांना आपलं पर्यावरण वाचवायचं होत, ज्यांना टेकड्या वाचवायच्या होत्या अशी साडेचार हजार लोकं आमच्याबरोबर रस्त्यावर उतरली होती, तेव्हा रवींद्र धंगेकर नुकतेच आमदार झाले होते त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला होता. आज आम्ही आम्हला पुण्याचे पर्यावरण खराब होऊन द्यायचे नाहीये आमचा लढा असाच चालू राहील या साठी आलो आहोत. आमची बाजू धंगेकरांसमोर आम्हला मांडायची आहे आम्हला त्यांचा पाठींबा हवा आहे त्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच पाठींबा देऊन निवडून आणू असे मत प्रदीप घुंबरे यांनी व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो